पुणे, ता. २७ ः ‘भारतीय विमानतळ प्राधिकरणा’तर्फे (एएआय) पुणे विमानतळावर प्रवाशांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर करण्यासाठी जुन्या टर्मिनल इमारतीचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती ‘एएआय’ने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
१४ जुलै रोजी पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल (न्यू इंटिग्रेटेड टर्मिनल बिल्डिंग-एनआयटीबी) प्रवाशांसाठी खुले झाले आहे. त्यामुळे आता २५ कोटी रुपये खर्च करून चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळात जुन्या टर्मिनल इमारतीचे विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरुवात होणार आहे.
यामध्ये जुन्या टर्मिनल इमारतीच्या आगमन हॉल कॉरिडॉरद्वारे नवीन टर्मिनलशी जोडून प्रशस्त प्रस्थान हॉलमध्ये रूपांतर करण्यात येईल. सुधारित क्षेत्रामध्ये १६ अतिरिक्त चेक-इन काउंटर असतील, जे प्रवाशांची प्रक्रिया सोपी करण्यासाठी आणि प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी बनविले जाईल. या व्यतिरिक्त सुरक्षा उपायांमध्ये वाढ करण्यासाठी आणि स्क्रीनिंग प्रक्रियेला गती देण्यासाठी अत्याधुनिक डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर आणि एक्स-रे मशीनसह एक सुरक्षा तपासणी क्षेत्र सुरू केले जाईल.
प्रवास अधिक आनंददायी...
विमानतळ विस्ताराचे कार्य मार्च २०२५ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा ‘एएआय’ने वर्तविली आहे. पायाभूत सुविधा आणि क्षमता वाढवून चेक-इन आणि तपासणीसाठी लागणारा वेळ कमी करणे, हे ‘एएआय’चे उद्दिष्ट आहे. ज्यामुळे विमानतळावरील प्रवाशांचा प्रवास अधिक आनंददायी होईल, असेही पत्रकात नमूद करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.