पुणे

नारायणराव पेशवा यांच्या खुनाची अभ्यासपूर्ण मांडणी

CD

पुणे, ता. ३० ः नारायणराव पेशवा यांचा खून ते पहिल्या आंग्ल मराठा युद्धाची सुरुवात असा सुमारे अडीच ते तीन वर्षांचा कालखंड अभ्यासपूर्ण पद्धतीने इतिहासप्रेमींपुढे सादर होणार आहे. डॉ. उदय कुलकर्णी यांच्या ‘राघोबा ः दी असॅसिनेशन ऑफ नारायणराव पेशवा’ या पुस्तकाचे रविवार एक सप्टेंबर रोजी प्रकाशन होणार आहे.
डॉ. कुलकर्णी यांच्या ऐतिहासिक लिखाणावरील हे आठवे इंग्रजी पुस्तक असून चार पुस्तकांचा मराठी अनुवाद झालेला आहे. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी त्यांना १८ महिन्यांचा कालावधी लागला. नारायणराव पेशवा यांच्या खुनासंबंधीची बखर या पुस्तकात वाचायला मिळणार आहे. इंग्लंडमधील रॉयल ॲशियाटिकमधून त्यांनी या बखरीची प्रत मिळविली असून डॉ. कुलकर्णी यांनी ती इंग्रजीत अनुवादित केली आहे. या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात शनिवारवाड्याचा १७९६ मधील नकाश आहे. खुनाच्या वेळी कोण कोठून शिरले, कोठून पळाले याचा उल्लेख त्यात आहे. नकाशावरील मोडी लिपिमधील मजकूरही वाचकांसाठी इंग्रजीत उपलब्ध केलेला आहे. डेक्कन कॉलेजमधून हा नकाशा त्‍यांनी मिळविला आहे. १७७२ पासूनचा घटनाक्रम यात आहे. एकूण ११ नकाशे आणि २६ चित्रांचाही समावेश पुस्तकात केलेला आहे.
रविवारी (१ सप्टेंबर) नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात सकाळी ११ वाजता पुस्तकाचे प्रकाशन ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, गोखले इन्स्टिट्यूटच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रा. प्रदीप आपटे, सोमय्या विद्यापीठातील इतिहासाचे सहयोगी प्राध्यापक गौरव गाडगीळ यांच्या उपस्थित होणार आहे. यावेळी होणाऱ्या चर्चासत्राचे संचलन अमित परांजपे करणार असून मंजिरी धामणकर सूत्रसंचालन करणार आहेत.

फोटो-------41775

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs JPN : मोठा वाद! श्रेयस अय्यर भांडला, अम्पायरने निर्णय बदलला; तसं नसतं झालं तर जिंकला असता जपान, नेमकं काय घडलं ?

आता फक्त Call-SMSचा प्लान, कंपन्यांना बंधनकारक; रिचार्ज होणार स्वस्त, TRAIचा मोठा निर्णय

Mark Wood Retirement: दोन वर्ल्ड कप जिंकणाऱ्या स्टार खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा; ३६ व्या वर्षी घेतला मोठा निर्णय

दुष्काळाची अधिसूचना शनिवारपर्यंत, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT