पुणे, ता. ३० : ‘‘आपले मन हे अत्यंत चंचल आहे. सगळ्या नकारात्मक गोष्टींचा उगम आपल्या मनातूनच होत असतो. पण मनावर नियंत्रण ठेवलं की आपलं सगळं काम सोपं होतं. म्हणून आपल्या मनाला गुरू माना आणि स्वतःच्या मनाचे स्वामी व्हा”, असे मत लेखक आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक संजय कप्तान यांनी व्यक्त केले.
सकाळ प्रकाशन प्रकाशित आणि संजय कप्तान लिखित ‘झेन तत्त्वज्ञान’ या पुस्तकाचे कोथरूड येथील भावार्थमध्ये गुरुवारी प्रकाशन झाले. या कार्यक्रमास भावार्थच्या कीर्ती जोशी, सकाळ प्रकाशनाच्या नूपुर जैन आदी उपस्थित होते.
जैन यांनी लेखक कप्तान यांच्याशी गप्पांच्या माध्यमातून संवाद साधला. झेन तत्त्वज्ञानाचा उगम भारतात कसा झाला आणि त्याचा विकास इतर देशांत कसा झाला याचा प्रवास कप्तान यांनी सोप्या भाषेत रसिक प्रेक्षकांना उलगडून दाखवला. आपल्या दैनंदिन जगण्यात हे तत्त्वज्ञान आपण कसे वापरायचे, स्वतःला ओळखून, स्वतःवर विश्वास ठेवून प्रथम स्वतःवर विजय कसा मिळवायचा ही मूलतत्त्वे या पुस्तकात लेखकाने सोप्या भाषेत मांडली आहेत.
पुस्तक खरेदी करण्यासाठी सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करा :
अधिक माहितीसाठी : ९८९१५९८९१५ (कॉलचे चिन्ह द्यावे), : ८८८८८ ४९०५० (व्हॉटसअॅपचे चिन्ह द्यावे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.