पुणे

पुण्यातील पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट

CD

पुणे, ता. ३० ः मालवण येथील राजकोट किल्ल्यावर पुतळा कोसळण्याच्या दुर्दैवी घटनंतर महापुरुषांच्या पुतळ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न अधोरेखित झाला आहे. त्यामुळे या घटनेचा धसका घेत पुणे महापालिकेने शहरातील सर्व पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला असून, हे काम सोमवारपासून सुरू होणार आहे.
महापालिकेने शहरात महत्त्वाचे चौक, उद्यानांमध्ये अनेक पुतळे उभे केले आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महर्षी कर्वे, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसह अन्य महान व्यक्तींचे पूर्णाकृती तसेच अर्धाकृती पुतळे गेल्या काही वर्षांत उभारले आहेत. या पुतळ्यांची दैनंदिन स्वच्छता, प्रकाश व्यवस्था महापालिका प्रशासनाकडून केली जाते. पण गेल्या अनेक वर्षांत या पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले नाही. पण आता राजकोट येथील घटनेनंतर प्रशासनाने यासाठी पाऊल उचलले आहे.

एका आठवडा चालणार काम
भवन विभागाकडे पुतळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट करणारी एजन्सी, भवन विभागातील व क्षेत्रीय कार्यालयाचा एक अभियंता असे तिघांचे पथक पुतळ्यांची पाहणी करणार आहे. यातून किती पुतळे सुरक्षित आहेत? किती पुतळ्यांना धोका आहे? धोका असलेल्या पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी काय केले पाहिजे याचा अहवाल या ऑडिटमधून तयार केला जाणार आहे. शहरातील सुमारे ५० पुतळे तपासण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.

सर्व पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट आठवडाभरात पूर्ण होईल. यामध्ये जी निरीक्षणे समोर येतील त्यानुसार आवश्‍यक त्या ठिकाणी सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जातील.
- युवराज देशमुख, मुख्य अभियंता, भवन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT