chandrakant patil ganesh festival esakal
पुणे

Chandrakant Patil: सामाजिक जाणिवांचा नव्याने श्रीगणेशा करूयात

Chandrakant Patil: "हिंदू समाजाने आपल्या उत्सवाचे पावित्र्य आपणच जपायला हवे.." चंद्रकांत दादांची विनंती, गणेश मंडळाना दिला सल्ला

चंद्रकांत पाटील

- चंद्रकांत पाटील, आमदार


सामूहिक कृतीची ताकद अमर्याद असते, ही सामूहिक कृती सकारात्मक आणि विधायकतेसाठी वापरली गेली, तर त्यातून असामान्य गोष्टी घडविता येतात. लोकमान्य टिळकांना या समूहशक्तीचे आकलन होते, म्हणूनच त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला चालना दिली. ब्रिटिशांच्या कठोर कायद्यांमुळे समाज गलितगात्र होऊन नैराश्याच्या गर्तेत लोटला गेला होता, त्या समाजाला चेतनेची आवश्यकता होती आणि ती निर्माण करण्याची ताकद सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमात आहे, याचे भान असलेल्या लोकमान्यांनी या उत्सवाला सुरुवात केली. या उत्सवाला आवश्यक असणारे व्यापक अधिष्ठान मिळवून दिले.

महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवातील लक्षावधी कार्यकर्त्यांनी सव्वाशे वर्षांहून अधिक काळात समाजाचा आधारस्तंभ बनण्याची भूमिका बजाविलेली आहे. समाजाशी असलेली नाळ या उत्सवाने अभंग ठेवलेली आहे. आपत्तीचे प्रसंग येतात, तेव्हा याच मंडळांचे कार्यकर्ते समाजाचे रक्षाकवच बनून मैदानात उतरतात. काळाच्या ओघात या उत्सवाचे स्वरूप बदलत गेले, अनावश्यक गोष्टी त्यागल्याही गेल्या. त्यामुळेच या उत्सवातील चैतन्य टिकलेले आहे.

पुण्याने संपूर्ण देशाला काय दिले, तर त्याचे एक प्रमुख उत्तर सार्वजनिक गणेशोत्सव. याचा अर्थ या उत्सवासंदर्भात पुण्यात काय घडते आहे, त्याचेच देशात अनुकरण होणार आहे. या दृष्टीने काही गोष्टी अधिक आग्रहाने, अधिक निग्रहाने आपल्याला करायला हव्यात, असे मला मनापासून वाटते. मुख्य म्हणजे, हा उत्सव धार्मिक तसेच सामाजिकही आहे. त्यामुळे सामाजिक दायित्व आणि धार्मिक पावित्र्य या दोन्ही गोष्टी जपायलाच हव्यात.

हिंदू समाजाने आपल्या उत्सवाचे पावित्र्य आपणच जपायला हवे. गणेशोत्सवाला साजेशी गाणी व संगीत वाजविले गेले पाहिजे. अंगविक्षेप न करता वारकर्‍यांप्रमाणे तल्लीनतेने, मनातील भक्तिभाव जागृत ठेवून रममाण झाले पाहिजे. याचाच दुसरा भाग म्हणजे, प्रत्येक महिला आणि ज्येष्ठ नागरिकाच्या मनातही सुरक्षिततेची भावना असण्याचेही दायित्व आपलेच आहे. आपल्या धर्माने महिलांचा आदर करायला शिकविले आहे, तसेच ज्येष्ठांचाही आदर करायला शिकविले आहे, याचा विसर पडू देऊ नका.

ध्वनिवर्धकांचा आवाज मर्यादित ठेवायला हवा. त्याच्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम फक्त ज्येष्ठ आणि गर्भवतींवरच होऊ शकतात, या भ्रमातून बाहेर यायला हवे. तसेच मेट्रो, एसी बस अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर आपण भर देत असलो, तरीही स्वमालकीच्या वाहनांचा वापर करणार्‍यांची संख्या अभूतपूर्व आहे. वाहतूककोंडी होणार नाही, यासाठी प्रत्येक गणेश मंडळाने कर्तव्य बजावायला पाहिजे, अशी माझी कळकळीची विनंती आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव हीदेखील काळाची गरज आहे. मूर्तीचे घरातच विसर्जन करणे, निर्माल्य नदीपात्रात न फेकता त्याच्यापासून खत तयार करता येईल का ते पाहणे, ध्वनिप्रदूषण रोखणे, यासाठीही आपण सज्ज होऊयात.

आपण याच विषयांवर अनेक वर्षे बोलतो आहोत, या वर्षीपासून आपल्या सामाजिक जाणिवांचा नव्याने श्रीगणेशा करूयात.
मंगलमय गणेशोत्सवाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivali News : कल्याण–डोंबिवलीत काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Niphad Crime : अंध अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्यास पंचवीस वर्षे सक्तमजुरी

Akola News : महापालिकेच्या मतदार यादीचा कार्यक्रम लांबणीवर; राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारीत तारखा जाहीर

Murlidhar Mohol : महापालिकेची निवडणूक वेळेत होईल; मुरलीधर मोहोळ यांचा दावा

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT