पुणे, ता. १५ : शुक्रवार पेठेतील सेवा मित्रमंडळाने कारगिल विजयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘कथा प्रेरणेची- गौरवगाथा विजयाची’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. गणेशोत्सवात मंडळातर्फे १० दिवस १० उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत भारतीय सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सैन्यदलातील पाच अधिकाऱ्यांची धान्यतुला करण्यात आली. यावेळी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते सैनिकांचा सन्मान करण्यात आला. उद्योजक सारंग पासकंटी, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, पराग ठाकूर, डॉ. मिलिंद भोई, शिरीष मोहिते, मंडळाचे अध्यक्ष पराग शिंदे, रोहन जाधव, वैभव वाघ, योगेश पासलकर, खजिनदार अमर लांडे आदी उपस्थित होते.
नायब सुभेदार विलास दामगुडे, रामधन मिरगे व दत्ता मोझर यांच्यासह बी. व्ही. गुरव, बजरंग निंबाळकर यांचा सन्मान आणि धान्यतुला करण्यात आली. आपले घर, लुई ब्रेल अपंग कल्याण संस्था, बचपन वर्ल्ड फोरम, संतुलन पाषाण, सेवाधाम या संस्थांना धान्य देण्यात आले. विक्रांत मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.