पुणे

गणेश विसर्जनासाठी सुरक्षिततेवर भर

CD

पुणे, ता. १५ : महापालिका प्रशासनाने गणेश विसर्जनाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. आवश्‍यक सर्व सोयीसुविधा पुरविण्याबरोबरच नागरिकांचे आरोग्य व सुरक्षिततेवर भर देण्यात आला आहे.

महापालिकेच्या विविध विभागांनी एकत्र येऊन विसर्जन मिरवणुकीसाठी सर्व सोई-सुविधा देण्यासाठीची तयारी पूर्ण केली आहे. विसर्जन घाटांवरील दुरुस्ती, रंगरंगोटी, लोखंडी टाक्‍या, निर्माल्य कलश, विसर्जन हौद, विसर्जन घाटांवरील विद्युत व्यवस्था, कचरा व्यवस्थापनावर भर देणार आहे. ठिकठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे, शौचालयांची स्वच्छता करण्याबरोबरच फिरत्या शौचालयांची (मोबाईल टॉयलेट) व्यवस्था केली आहे. मिरवणूक मार्गांवर स्वच्छता, निर्माल्य कलश, कीटकनाशक फवारणी करण्यात आली आहे. नदीकाठासह सर्व ठिकाणी हौद, लोखंडी हौदांची व्यवस्था पूर्ण झाली आहे. तेथे जीवरक्षक, सुरक्षा यंत्रणा, विद्युत जनित्र, ध्वनिक्षेपक यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

क्षेत्रीय कार्यालयांकडूनही सुविधा
क्षेत्रीय कार्यालयांनी मिरवणुक मार्गावरील झाडे, फलक, केबल यांसारखे अडथळे दूर केले आहेत. शाळा, सरकारी वसाहती, सार्वजनिक ठिकाणी हौदांची व्यवस्था केली आहे. सोयीसुविधा पुरविण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. पोलिस, महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मंडप, वॉच टॉवर, मदत केंद्रांची व्यवस्था केली आहे. वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांची खास पथके नेमून स्वच्छतेपासून सर्व कामांचे महापालिका प्रशासनाने नियोजन केले असून त्यामध्ये सर्व क्षेत्रीय कार्यालयांचा सहभाग आहे.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना
१) नदीकाठावर विसर्जन करताना अनुचित घटना घडू नये, यासाठी अग्निशामक दलाचे जवान सज्ज ठेवणार
२) खासगी जीवरक्षक तैनात करणार
३) अग्निशामक दलाचे जवान, खासगी जीवरक्षकांना लाइफ जॅकेट व रात्रीच्या वेळी जीवरक्षक पटकन नजरेस पडावेत, यादृष्टीने त्यांना फ्लोरोसेन्ट जॅकेट उपलब्ध करून देणार
४) नदीकाठावर आडवा दोरखंडही लावण्यात आला आहे. एखादी व्यक्ती प्रवाहाबरोबर वाहून गेल्यास तो दोरखंडास पकडून स्वतःचा जीव वाचवू शकतो.
५) नटराज घाटावर लाइफ मास्ट बसविण्यात आला आहे. त्यामुळे आपत्कालीनप्रसंगी नदीपात्रात प्रकाश उपलब्ध करून बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविता येणार.

नैसर्गिक जलस्त्रोतांत विसर्जन नको
गणेशमूर्तींचे विसर्जन नदी, तलाव यांसारख्या नैसर्गिक जलस्त्रोतात करू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी मूर्तीचे विसर्जन हौदामध्ये करावे किंवा गणेशमूर्ती विसर्जनाऐवजी ‘मूर्तीदान’ या संकल्पनेअंतर्गत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे दान करावे, जमा झालेले निर्माल्य कोठेही न टाकता महापालिकेच्या यंत्रणेकडे सुपूर्त करावे किंवा निर्माल्य कलशामध्ये टाकावे, असेही आवाहन महापालिकेने केले आहे.

प्रमुख विसर्जन घाट
संगम घाट, ओंकारेश्वर घाट, वृद्धेश्वर घाट / सिद्धेश्वर घाट, पुलाचीवाडी, नटराज चित्रपटगृहामागे, अष्टभुजा मंदिर (नारायण पेठ), खंडुजीबाबा चौक, बापूघाट (नारायण पेठ), गरवारे कॉलेजची मागील बाजू, विठ्ठल मंदिर (अलका चौक), दत्तवाडी घाट, ठोसरपागा घाट, औंधगाव घाट, राजाराम पूल घाट, सिद्धेश्वर मंदिर, बंडगार्डन घाट, चिमा उद्यान येरवडा, पांचाळेश्वर घाट, वारजे कर्वेनगर

विसर्जन मिरवणुकीची वैशिष्ट्ये
- मूर्ती विसर्जनासाठी हौदांमध्ये स्वच्छ पाणी
- घाटांच्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था
- महिलांसाठी हिरकणी कक्ष

- दैनंदिन स्वच्छता, साफसफाईला प्राधान्य
- नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अग्निशामक दल, जीवरक्षक, सुरक्षारक्षकांची व्यवस्था
- महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह कलाकार, वादक स्वच्छता अभियानात होणार सहभाग
- अग्निशामक दलाचे जवान व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार, सुट्ट्या रद्द
- विसर्जन घाटासह क्षेत्रीय कार्यालयांकडूनही जीवरक्षकांची नेमणूक

महापालिकेचे आवाहन
- नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये
- नदीकाठावरच अग्निशामक दलाचे जवान व भोई लोकांकडूनच ‘श्रीं’च्या मूर्तीचे विसर्जन करावे
- लहान मुलांना नदी, कॅनॉल, विहीर, तळ्यापासून दूर ठेवावे
- विसर्जनासाठी नावेतून/होडीतून जाताना क्षमतेपेक्षा जास्त व्यक्तींनी बसू नये
- महापालिकेने नेमलेल्या जीवरक्षकांकडून मूर्तीचे विसर्जन करावे
- पावसामुळे नदीकाठचा परिसर निसरडा झाल्यास काळजी घ्या
- अनुचित घटना टाळण्यासाठी अधिकृत घाट, महापालिकेचे विसर्जन हौद व विसर्जन व्यवस्थेच्या ठिकाणीच विसर्जन करावे
- घाटांवर बसविलेल्या ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांकडून सूचना दिल्या जाणार

आपत्कालीन परिस्थितीत येथे साधा संपर्क
- ०२०- २५५०/१२६९
- ०२०- २५५०/६८००/१/२/३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT