पुणे

दिवाळीत वाहन उद्योगही सुसाट वाहने रस्त्यावर

CD

पुणे, ता. ३१ ः दसरा व दिवाळीच्या काळात ५५ हजार नवीन वाहने रस्त्यावर दाखल झाली. पुण्यात ३३ हजार तर पिंपरी चिंचवडमध्ये २२ हजार नवीन वाहनांचा समावेश आहे. नवीन वाहनामध्ये दुचाकींची संख्या अधिक आहे. तसेच चारचाकीमध्ये ‘हायब्रीड’ व ‘इलेक्ट्रिक’चा पर्याय उपलब्ध असला तरीही ग्राहकांनी पेट्रोल व डिझेलवरील वाहने खरेदी करण्याला प्राधान्य दिले आहे. इलेक्ट्रिक वाहनांना मागणी कमी आहे.
पुण्यात दसऱ्याच्या काळात सुमारे ११ हजार वाहनांची विक्री झाली आहे. तर दिवाळीच्या काळात २२ हजार वाहनांची विक्री झाली आहे. दसऱ्यापेक्षा अधिक विक्री दिवाळीच्या काळात झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये देखील दसऱ्याच्या तुलनेत दिवाळीला जास्त विक्री झाल्याची आरटीओ कार्यालयात नोंद झाली आहे. पिंपरीमध्ये दसऱ्याच्या काळात सुमारे आठ हजार तर दिवाळीच्या काळात १४ हजार नवीन वाहनांची विक्री झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वाहनाच्या विक्रीत वाढ झाली आहे.

खासगी वाहनांकडे वाढता कल
पुण्यात सार्वजनिक वाहतुकीचे साधने उपलब्ध असतानादेखील नागरिकांचा कल स्वतःचे वाहन खरेदी करण्याकडे अधिक वाढत चालला आहे. कोरोनानंतर पुण्यात खासगी वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

आकडे बोलतात
वर्ष : पेट्रोल व डिझेल विद्युत
२०२२ : १८,८२४ १,९२९
२०२३ : २०, ०८३ १७०२
२०२४ : २१,२४७ ६५८
(ही आकडेवारी दसरा ते दिवाळीच्या काळात पुणे आरटीओ कार्यालयात नोंद झालेल्या वाहनांची आहे)

सर्वसाधारपणे ग्राहकांचा दुचाकी वाहनांच्या खरेदीकडे अधिक कल आहे. दसरा व दिवाळीच्या काळात झालेल्या वाहनांची विक्री अधिक असल्याने ‘आरटीओ’च्या महसुलातदेखील मोठी वाढ झाली आहे. सुमारे १०८ कोटींचा महसूल पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयाला प्राप्त झाला आहे.
- संदेश चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड

खासगी वाहनाच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी वाहनांची संख्या वाढली आहे.
- स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT