पुणे

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण

CD

‘सीबीआय’ने गोळीचे
स्पष्टीकरण दिलेले नाही
बचाव पक्षाचा युक्तिवाद, दाभोलकर हत्या प्रकरण

पुणे, ता. १४ ः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी पाठीमागून पिस्तुलातून गोळ्या झाडल्या असतील, तर एक गोळी भुवईतून घुसून डोक्याच्या मागे कशी गेली, याचे स्पष्टीकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिलेले नाही. तसेच ‘सीबीआय’ने महत्त्वाचे पोलिस अधिकारी तपासलेले नाहीत, असा दावा बचाव पक्षाने न्यायालयात केला आहे.
विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणाची सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये बचाव पक्षाचे वकील ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी अंतिम युक्तिवाद केला. या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे याला डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडताना स्वतः पाहिलेले नाही, तसेच कळसकर याचे छायाचित्र वर्तमानपत्रात पाहिले होते, अशी साक्ष एका साक्षीदाराने दिली आहे. डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्यानंतर पळून जाणाऱ्या हल्लेखोरांना पाहिल्याचा दावा करणाऱ्या साक्षीदाराच्या साक्षीतही तफावत दिसत आहे. त्यामुळेच ‘सीबीआय’ने आरोपींची ओळख परेड केलेली नाही, असा युक्तिवाद ॲड. इचलकरंजीकर यांनी केला. गुन्हा घडल्यानंतर ‘अंनिस’चे कार्यकर्ते आपल्याकडे आले होते, असेही एका साक्षीदाराने मान्य केले असल्याचे ॲड. इचलकरंजीकर यांनी सांगितले. मुख्य आरोपींकडे पिस्तूल सापडले नसल्याच्या मुद्याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ व २७ मार्चला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT