पुणे

लष्कर न्यायालयाचे वानवडीत स्थलांतर

CD

पुणे, ता. ९ : अपुरी जागा आणि बांधकाम जीर्ण झाल्याने लष्कर न्यायालय तात्पुरते वानवडीत स्थलांतरित करण्यात आले आहे. वानवडीत पुणे महानगरपालिकेच्या महात्मा फुले सांस्कृतिक भवनात हे न्यायालयात स्थलांतरित झाले आहे. त्यामुळे आता सोमवारपासून (ता. १०) लष्कर न्यायालयातील कामकाज नवीन ठिकाणी चालणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून या न्यायालयासाठी स्वतंत्र जागा देण्याची मागणी होत आहे. मात्र, नवीन जागा न मिळाल्याने आणि येथे कामकाज करणे शक्य नसल्याने न्यायालयात तात्पुरत्या स्वरूपात दुसरीकडे हलविण्यात आले आहे. पुणे जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत कॅम्पमध्ये अनेक वर्षे लष्कर न्यायालय कार्यान्वित आहे. या न्यायालयात हडपसर, लष्कर, वानवडी, कोंढवा आणि व मुंढवा पोलिस ठाण्यांचे कामकाज चालते.
या न्यायालयात सध्या सुमारे ३० हजारांहून अधिक खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे न्यायालय लवकरात लवकर एका प्रशस्त जागेत स्थलांतरित होणे गरजेचे आहे. पुरेसे कोर्ट हॉल आणि आवश्यक त्या पायाभूत सुविधा नसल्याने येथील खटले प्रलंबित राहत आहेत. प्रशस्त ठिकाणी न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यास पक्षकारांचे दावे आणि तक्रारी लवकरात लवकर निकाली लागून त्यांना न्याय मिळेल, अशी माहिती येथे प्रॅक्टीस करणाऱ्या वकिलांनी दिली.

तात्पुरत्या ठिकाणी स्थलांतरित होत असतानादेखील तेथे केवळ तीनच कोर्ट हॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रलंबित दाव्यांचा विचार करता येथे आणखी कोर्ट आणि कर्मचारी असणे आवश्यक आहे. त्यामुळे आणखी दोन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात यावी. या मागणीबाबत आम्ही मुंबर्इ उच्च न्यायालय, राज्य शासनाचा न्याया व विधी विभाग आणि पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीशांकडे पाठपुरावा करत आहोत.
-ॲड. के. टी. आरू-पाटील, माजी उपाध्यक्ष पुणे बार असोसिएशन.

या पोलिस ठाण्यांतील गुन्ह्यावर होते सुनावणी
हडपसर, लष्कर, वानवडी, कोंढवा, मुंढवा

प्रलंबित दाव्यांची संख्या :
सुमारे ३० हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT