पुणे

पाणी साचणाऱ्या १७० ठिकाणांची निवड

CD

पुणे, ता. ९ : शहराच्या वेगवेगळ्या भागांत पाणी साचणारी १७० ठिकाणे महापालिकेने निवडली आहेत. याबरोबरच आणखी नवीन ठिकाणे शोधून त्यांची नोंद घेतली जात आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी पावसाळी वाहिन्या, चेंबरवर साचलेला कचरा साफ करणे आणि पाणी प्रवाही राहण्यासाठी यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे.
पुण्यात मंगळवार आणि शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेची यंत्रणा उघडी पडली. शनिवारी वेगवेगळ्या भागांत पाणी साचण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. या दरम्यान महापालिकेची यंत्रणा रस्त्यांवर न दिसल्याने टीकेची झोड उठली होती. त्यामुळे महापालिकेची यंत्रणा रविवारी काही प्रमाणात हलली.
पाणी साचण्याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत. चेंबरच्या जाळ्यांमध्ये कचरा अडकल्याने पाणी साचते, त्यामुळे तेथे कचरा अडकून राहू नये यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मनुष्यबळ, ठिकठिकाणी पंप, जेंटिंग मशिनद्वारे पाणी काढण्यासाठी भर देण्यात येणार आहे.

पाणी साचण्याची ठिकाणे निश्‍चित करून तेथे पुन्हा पाणी साचू नये, यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. याबरोबरच पाणी साचणारी नवीन ठिकाणे शोधून तेथेही उपाययोजना केल्या आहेत.
- महेश पाटील,
उपायुक्त, आपत्ती व्यवस्थापन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Ghee Adulteration : तिरुपतीच्या लाडूच्या तुपात पाम तेल आणि रसायनांचा वापर? EDकडून कंपनीच्या प्रवर्तकाला अटक

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Farmer Loss Assessment : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; पाच ऑक्टोबरपासून पंचनामे करण्याचे आदेश

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

Cash Promises Ahead of Upcoming Elections : “पैसै घ्या, मते द्या’’आदित्यनाथ आणि ट्रम्प एकाच माळेचे मणी

SCROLL FOR NEXT