पुणे

सोसायटीतील सुरक्षारक्षकाकडून तरुणीचा विनयभंग

CD

पुणे, ता. ९ : पार्सल देण्याच्या बहाण्याने सदनिकेत आलेल्या सोसायटीतील सुरक्षारक्षकाने तरुणीचा विनयभंग केला. कल्याणीनगर भागातील एका सोसायटीत हा प्रकार घडला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी सुरक्षारक्षकाला अटक केली आहे.
विक्रम लक्ष्मण वाघ (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याबाबत एका २८ वर्षीय तरुणीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी कल्याणीनगर भागातील एका सोसायटीत दहाव्या मजल्यावर राहायला आहे. तरुणीने ऑनलाइन पद्धतीने काही वस्तू मागविल्या होत्या. या वस्तू देण्याच्या बहाण्याने सुरक्षारक्षक विक्रम सदनिकेत शिरला. तरुणीकडे पाहून त्याने अश्लील वर्तन केले. तरुणीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

SCROLL FOR NEXT