पुणे

तलाठ्यांच्या बदल्या आता ऑनलाइन होणार

CD

पुणे, ता. १० : तलाठी बदल्यांमधील गैरप्रकार, वशिलेबाजी रोखण्यासाठी राज्य शासनाने तलाठ्यांच्या बदल्या आॅनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अभ्यास गटाची स्थापना केली आहे.
या अभ्यास गटाचे अध्यक्ष म्हणून पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्यपदी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महसूल विभागाचे सहसचिव संजय बनकर, अपर जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपजिल्हाधिकारी अभिषेक देशमुख तर सचिवपदी पुण्याचे विभागीय उपायुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांत समितीला अहवाल सादर करण्याची सूचना राज्य शासनाने दिली. याबाबतचा शासन निर्णय महसूल विभागाचे कार्यासन अधिकारी शीतल माने यांनी काढले आहेत.
यापूर्वी तलाठी बदलीचे अधिकार हे प्रांताधिकाऱ्यांना होते. त्यामुळे एक किंवा दोन तालुक्‍यांमध्येच पूर्ण सेवा करून तलाठी निवृत्त होत होते. तसेच काही तलाठी राजकीय वजन वापरून हवा तो तालुका मिळवत होते. सप्टेंबर २०२३मध्ये राज्य शासनाने तलाठी बदल्यांचे अधिकार हे जिल्हाधिकारी यांना दिले. त्यामुळे तलाठ्यांची बदली जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्‍यात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT