पुणे

जूनच्या पहिल्या आठवड्यातच जिल्ह्यात सरासरीच्या निम्मा पाऊस

CD

पुणे, ता. १० : पुणे शहर व जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यातील पहिल्या दहा दिवसांतच या महिन्यातील एकूण सरासरी पावसाच्या निम्मा पाऊस झाला आहे. यानुसार १० जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८८.९० मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक २०१.६ मिलिमिटर पाऊस पुणे शहरात पडला आहे.
जून महिन्याचा शहर व जिल्ह्याचा एकूण सरासरी पाऊस हा १७६.२ मिलिमीटर आहे. यापैकी आतापर्यंत प्रत्यक्षात ८८.९० मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसाचे हे प्रमाण जून महिन्यातील सरासरी पावसाच्या ५०.५ टक्के झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी १ जूनपासून पडलेल्या पावसाच्या दैनंदिन नोंद केली जाते. यानुसार तालुका व महिनानिहाय एकूण सरासरी पाऊस, प्रत्यक्षात झालेला पाऊस आणि एकूण सरासरीच्या तुलनेत झालेला पाऊस टक्केवारीत नोंदला जातो.
दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक १५०.३ मिलिमिटर पाऊस इंदापूर तालुक्यात पडला असून, सर्वांत कमी म्हणजे केवळ २७ मिलिमिटर पाऊस जुन्नर तालुक्यात नोंदला गेला आहे. यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यातील पहिल्या आठवड्यातील ४ तारखेपर्यंत कुठेही पाऊस पडला नव्हता. ५ जूनपासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली असून, या महिन्यातील पहिल्या आठवड्यातील अवघ्या पाचच दिवसांत जून महिन्यातील एकूण सरासरी पावसाच्या निम्मा पाऊस नोंदला गेला असल्याचे सोमवारी (ता.१०) जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तालुका......पाऊस........टक्केवारी
मिलीमिटरमध्ये
पुणे शहर --- २०१.६......१३१.९
हवेली --- ११०.५..........६३.००
मुळशी --- ६५.१.......२३.४
भोर --- १०४.२........५०.७
मावळ --- ४२.८........१९.१
वेल्हे --- ९०.८..........१९.५
जुन्नर --- २७..........२३.४
खेड --- ४४.९........३५.३
आंबेगाव --- ५०.६..........३७.७
शिरूर --- ७८........८६.६
बारामती --- १४७.९..........१६९.८
इंदापूर --- १५०.३..........१४७.२
दौंड --- ११०.५...........११६.९
पुरंदर --- ७१.९........६४ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

Latest Marathi News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

SCROLL FOR NEXT