पुणे

पावसाळ्यात पाळीव प्राण्यांना जपा...

CD

पुणे, ता. ११ : बाल्कनीत बसून एका हातात गरमागरम कॉफी आणि दुसऱ्या हातात गरमा गरमा भजी. यासोबत पाऊस पाहणे आणि पावसाची गाणी ऐकणे ही एक सुंदर अनुभूती आहे. पावसाळ्यात तुम्ही स्वतःला उबदार ठेवून आणि घरात राहून सर्व खबरदारी घेता पण तुमच्या ‘फर’ मित्राचे काय? श्वान, मांजर, ससा, परदेशी पक्षी यांना पावसाळ्याच्या अनेक आजारांचा सामना करावा लागतो.
पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे साथीचे तसेच तापमानजन्य आजार या काळात बळावतात. अशात माणसांसोबतच घरातील पाळीव प्राण्यांची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात घरातील पाळीव प्राण्यांना अनेक संसर्गजन्य आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे पावसाळ्यात पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचा सल्ला पशू वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

अशी घ्या काळजी...
१) भिजल्यावर त्यांना सुती टॉवेलने स्वच्छ पुसून घ्या. तसेच त्यांना झोपण्यासाठी उबदार कापड ठेवा.
२) ओलसर वातावरणामुळे गोचिड आणि पिसवांची संख्या वाढते. यामुळे तुमच्या घरातल्या प्राण्याचे आवश्यक लसीकरण करून घ्यावे
३) पावसाळ्यात या प्राण्यांची घरातच खेळण्याची सोय करा
४) स्वच्छ भांड्यात खायला द्या. त्यांना वेळोवेळी अन्न देत राहा.
५) कॅनाइन पार्व्होव्हायरस व लेप्टोस्पायरोसिसला प्रतिबंध करण्यासाठी तुमच्या पाळीव प्राण्याचे लसीकरण करून घ्या.
६) पाळीव प्राण्यांपासून कीटकनाशके दूर ठेवा.
७) बाहेरून आल्यानंतर घरातील श्वान किंवा मांजरीचे पंजे साफ करा. यामुळे त्यांना संसर्ग होणार नाही.
८) ढगांच्या कडकडाटामुळे प्राणी घाबरतात. त्यामुळे ते अस्वस्थ होतात. त्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे द्या
९) प्राण्यांचे पोट वेळेवर रिकामे होईल, याची काळजी घ्या.
१०) प्राणी आनंदी राहण्यासाठी त्यांना वेळ द्या, त्यांच्याबरोबर जमेल तेव्हा खेळा त्यांच्याबरोबर खेळा

‘‘माझ्या घरी श्वान आहे. बाहेर पाऊस सुरू असल्याने फिरायला नेऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्या स्वभावात बदल होतो. भुंकणे किंवा चिडचिड करणे वाढते. गोचिड किंवा पिसवांमुळे त्याला त्रास होऊ नये यासाठी पावसाळा सुरू झाला की अधिक काळजी घ्यावी लागते.’’
- रमा चरणकर, प्राणीप्रेमी
----------
‘‘पावसाळ्यात बहुतेक पाळीव प्राण्यांना भेडसावणाऱ्या गोचीड आणि पिसवा या नेहमीच्या समस्या आहेत. अस्वच्छ पाणी त्यांनी प्यायले तर, आतड्यांसंबंधी आणि पोटाचे विकार होऊ शकतात. पावसाळ्यात नियमित ग्रूमिंग करणे गरजेचे असते. लांब फर असलेली कुत्री आणि मांजरी योग्यरित्या देखभाल न केल्यास ते जिवाणू आणि बुरशीचे देखील आजार होऊ शकतात.’’
- डॉ. सलोनी जोशी, पशुवैद्यकीय तज्ज्ञ.
---------------
पावसाळ्यामध्ये दोन महिने ते दीड वर्षांपर्यंत वय असणाऱ्या लहान श्वानांना गॅस्ट्रो होण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे प्राण्यांना उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी द्यावे. तसेच पावसाळ्यापूर्वी त्यांचे लसीकरण करावे.
- डॉ. नरेंद्र परदेशी, पशुवैद्यकीय तज्ज्ञ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT