Kalyani Nagar Accident sakal
पुणे

Kalyani Nagar Accident : मुलाचा सुधारगृहातील मुक्काम वाढणार का?

पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात ठेवण्याची मुदत बुधवारी (ता. १२) संपत आहे. त्यामुळे मुलाचा सुधारगृहातील मुक्काम वाढणार, की त्याची सुटका होणार याचा निर्णय उद्या होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात ठेवण्याची मुदत बुधवारी (ता. १२) संपत आहे. त्यामुळे मुलाचा सुधारगृहातील मुक्काम वाढणार, की त्याची सुटका होणार याचा निर्णय उद्या होणार आहे.

सुधारगृहातून सुटका झाल्यास त्याच्या जीविताला धोका आहे, असे म्हणणे त्यावेळी पोलिसांकडून सादर करण्यात आले होते. गुन्हा घडल्यानंतर त्याच दिवशी अल्पवयीन मुलाला जामीन देण्यात आला होता. त्यानंतर या गुन्ह्यात विविध प्रकाराचे कट रचण्यात आले. त्यातून आणखी तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

अल्पवयीन मुलगा बाहेर राहिल्यास तपासात अडथळा निर्माण होवू शकतो किंवा पुराव्यांशी छेडछाड होवू शकते. ही परिस्थिती विचारात घेऊन मुलाचा सुधारगृहातील मुक्काम आणखी १४ दिवस वाढविण्यात यावा, अशी मागणी गुन्ह्याचे तपास अधिकारी असलेले सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी केली होती. तर मुलाची सुरक्षा आणि त्याचे पुनर्वसन या दोन्हींचा विचार करून त्याच्या बालसुधारगृहाकडे असलेल्या ताब्याच्या मुदतीत वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद मंडळातील विशेष सहाय्यक सरकारी वकील मोनाली काळे यांनी केला होता. मुलाची सुटका झाल्यानंतर पोलिस बोलवतील तेव्हा चौकशी येण्यास मुलगा तयार आहे. त्यामुळे मुदतवाढ देण्यात येवू नये, असा युक्तिवाद मुलाचे वकील प्रशांत पाटील यांनी केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत मंडळाने मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम १२ जूनपर्यंत वाढवला होता.

अल्पवयीन मुलाला पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात पाठविण्याचा आदेश मंडळाने दिला होता. ती मुदत संपत असल्याने पोलिसांनी मुलाला आणखी १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्यात यावे, असा अर्ज तीन जूनला केला होता. अद्याप मुलाचे समुपदेशन सुरू आहे. तसेच व्यसनाधिनतेबाबतही त्याला समुपदेशन करण्यात येत आहे.

मुलाला मारहाण करणाऱ्यांवर कारवार्इ करावी
अपघात झालेल्या दिवशी काही नागरिकांनी मुलाला मारहाण केली होती. मुलाच्या डोळ्याला, गुप्तांगावर आणि डोक्यातही मारहाण झाली होती. मुलांना मारहाण करणाऱ्यांवर कारवार्इ करण्यात यावी. बॉलर पबमधील, पबच्या पार्कींगमधील व पब असलेल्या लेनमधील सर्व सीसीटीव्ही फुटेज पुरविण्यात यावेत. तसेच मुलगा आणि त्याच्या मित्रांचे पबमधील बिल मिळावे, अशी मागणी मुलाच्या वकिलांनी मंडळाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT