पुणे

ज्येष्ठ नागरिकांसाठी शुक्रवारी विशेष कार्यक्रम

CD

पुणे, ता. १२ ः जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जनजागृती दिनानिमित्त शहरातील विविध संघांच्या सहभागाने शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी ४ ते ६ दरम्यान विशेष कार्यक्रम नवी पेठेतील निवारा वृद्धाश्रम येथे होणार आहे. ज्यात ज्येष्ठ नागरिक संघ, फेस्कॉम, अॅस्कॉप, योग संस्थांचा सहभाग असेल, अशी माहिती ‘फेस्कॉम’चे अध्यक्ष अरुण रोडे यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली.
ज्येष्ठ नागरिकांचे सरासरी आर्युमान वाढले असून ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे १२ टक्के आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अभ्यासानुसार २०५० मध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या २५ टक्के होईल. त्यामुळे ‘ज्येष्ठ नागरिक’ हा समाजातील एक मोठा आणि महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यासाठी जगात वेगवेगळया देशात ज्येष्ठांच्या कल्याणार्थ तसेच कौटुंबिक आणि सामाजिक सुरक्षतेसाठी विविध कायदे केले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने १५ जून हा दिवस ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जनजागृती दिन’ म्हणून जाहीर केला असून त्यानिमित्ताने हा कार्यक्रम होणार आहे. त्याच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी तर, प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, तसेच निवृत्त पोलिस आयुक्त जयंत उमराणीकर, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मल्लिकार्जुन हरसुरे आदी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री साडे आठ वाजता संबोधित करणार, काय बोलणार?

Sahil Shaikh Story : बापानं गवंडी काम केलं, तर आईनं शेती! लेकानं जिद्दीच्या जोरावर मिळवली खाकी; वाचा पाचवेळा अपयश पचवलेल्या साहिल शेखची प्रेरणादायी यशोगाथा

Latest Marathi News Live Update: पॉश ॲक्टमध्ये बदल होणे गरजेचे - चित्रा वाघ

वाढलेले केस, सुटलेलं पोट... स्वतःची बॅग स्वतःच घेऊन निघाला ९०चा सुपरस्टार अभिनेता, तुम्ही ओळखलंत का?

प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या 40 व्या वर्षी निधन; कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT