पुणे

महाविकास आघाडीचे विधानसभेचे जागावाटप जूनअखेरपर्यंत ठरणार : सतेज पाटील

CD

पुणे, ता. ११ : ‘‘महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणतीही अडचण येणार नाही. लोकसभेला एक-दोन जागा व्यतिरिक्त अन्य जागांचे सुरळीत वाटप झाले. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणूकीसाठी २८८ जागांचे वाटप लवकरात लवकर होईल. जागा वाटपाबाबतच्या चर्चांना जूनअखेरपर्यंत मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे,’’ असे सूतोवाच काँग्रेसचे नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केला. ‘‘आमच्यात कोणतीही वादावादी होणार नाही,’’ अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली.

‘सकाळ’च्या कार्यक्रमानिमित्त पुणे दौऱ्यावर आलेले असताना पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणाला किती जागा मिळतील, याची उकल लवकरच होईल, असे पाटील यावेळी अधोरेखित केले. ते म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना एकमेकांच्या मतांचा फायदा झाला आहे. राज्यातील जनतेला आमची संयुक्त ताकद अपेक्षित आहे. सामान्य नागरिक महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्राला आवडलेले नाही.’’

सतेज पाटील म्हणाले, ‘‘आमचे नेते राहुल गांधी यांनी मणिपूरची व्यथा जगाला दाखविण्याचा प्रयत्न केला. वर्षभराने का होईना सगळ्यांना मणिपूरची आठवण होत आहे. किमान आता तरी सरकारने याकडे लक्ष द्यावे आणि तेथील जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा आहे.’’ महाविकास आघाडीत कोण मोठा भाऊ आणि कोण लहान भाऊ याबद्दलचा खुलासा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केला असल्याचे सांगत पाटील यांनी याविषयी बोलणे टाळले. पुण्यासह राज्याला केंद्रात पाच मंत्रिपद मिळाल्याचा आनंद असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच, केंद्रातून महाराष्ट्राला जास्तीत जास्त निधी यावा. केंद्र सरकारचा निधी गुजरातकडे न जाता महाराष्ट्रात यावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भाजपने मित्र पक्षांचा वापर केला : सतेज पाटील
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत भाजपच्या मित्र पक्षांमध्ये असलेल्या नाराजीबद्दल बोलताना पाटील म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीपुरते सगळ्यांना वापरून घ्यायचे, हा एकच उद्देश भाजपचा होता. लोकसभा निवडणुकीनंतर कोणाचाही विचार करायचा नाही, हे भाजपच्या कृतीतून सिद्ध झाले आहे. फोडाफोडीच्या राजकारणातून लोकसभेत बहुमत गाठायचा भाजपचा प्रयत्न होता. फुटलेल्या गटाला किती महत्त्व द्यायचे, हे त्यांनी ठरविले असून ते मंत्रिमंडळाच्या विस्तारात दिसले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Chhatrapati Sambhajinagar: रॉकेल मिळणार; पण ‘स्टोव्ह’ कुठून आणणार?; अनेक कुटुंबांचा प्रश्न ः एकच सिलिंडर असलेल्या गृहिणींपुढे अडचणींचा भडका

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर ‘ईव्ही हब’ बनणार; अतुल सावे : मराठवाड्याच्या विकासावर परिषदेत मंथन

IPL 2026: RCB घरच्या मैदानात SRH ला भिडणार, पण पहिल्याच सामन्याला हुकमी एक्के मुकणार; जाणून घ्या संभावित Playing XI

Latest Marathi News Live Update : रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार

SCROLL FOR NEXT