पुणे

‘द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन’ची निवडणूक जाहीर

CD

पुणे, ता. ११ : कौटुंबिक न्यायालयातील वकिलांची संघटना असलेल्या ‘द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन’ची वार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. २८ जून रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
निवडणुकीसाठी ३९८ जणांची प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘वन बार, वन व्होट’ घोषणापत्र सभासदांना द्यावे लागणार आहे. १५ जूनपर्यंत दुपारी १२ ते तीन या वेळेत हे डिक्लेरेशन स्वीकारण्यात येणार आहे. दुपारी चार वाजता अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यावर १८ आणि १९ जूनला दुपारी १२ ते तीन या वेळेत हरकती घेता येणार आहेत. १९ जूनला दुपारी चार वाजता अंतिम यादी जाहीर होणार आहे. २० आणि २१ जूनला उमेदवारी दाखल करता येणार आहेत. २२ जून रोजी अर्जांची छाननी होणार असून, २४ ला दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. २४ जून रोजी दुपारी चार वाजता अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. २८ जूनला सकाळी १० ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे. मतदानानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ॲड. अमृता गुरव-देशमुख या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख ज्ञानेश कुमार , त्यांना तातडीने तुरुंगात टाका: उद्धव ठाकरे घणाघात

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT