पुणे

चालकांकडून पैसे घेतल्यास पोलिसावर खंडणीचा गुन्हा

CD

पुणे, ता. ११ : नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांची अडवणूक करून त्यांच्याकडून चिरीमिरी उकळणाऱ्या वाहतूक पोलिसांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. वाहतूक पोलिस वाहनचालकांकडून पैसे घेताना आढळल्यास त्यांच्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
वाहतूक कोंडी होत असताना अनेकदा वाहतूक पोलिस कर्मचारी गाड्या उचलण्यामध्ये किंवा वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसुल करण्यामध्ये व्यग्र असतात. तसेच चौकात आणि रस्त्यांवर उभे राहण्याऐवजी वाहतूक पोलिस आडबाजूला छुप्या पद्धतीने उभे राहतात. चार-पाच जण एकदम वाहन चालकांच्या अंगावर जातात आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमांखाली दंडात्मक कारवाई करायला सुरुवात करतात. घाबरलेल्या वाहन चालकांकडून मोठ्या दंडाची रक्कम ऐकून त्यांच्याकडे विनवणी सुरू केली जाते. त्यावेळी पोलिसांकडून वाहन चालकांकडे पैशांची मागणी केली जाते. काही रक्कम घेऊन त्यांना सोडून दिले जाते. अशा प्रकारे चिरीमिरी घेण्याचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालेले आहेत. या घटनांची गंभीर दखल घेऊन कुमार यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.


पोलिसांची नेमणूक
वाहन चालकांकडून पैसे घेणारे पोलिस शोधण्यासाठी पोलिस आयुक्तांनी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. हे पोलिस साध्या वेशामध्ये वाहनचालक म्हणून शहराच्या विविध भागांत फिरणार आहेत. पोलिस नागरिकांवर कारवाई करताना चिरीमिरी घेतात का?, त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात का?, याची या पथकाकडून पाहणी केली जाणार आहे. गैरप्रकार आढळून आल्यानंतर तत्काळ खंडणीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे कुमार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bomb Case: सीसीटीव्हीतील व्यक्ती स्वतःहून पोलिसांसमोर; पण निघाला MR, बॉम्ब प्रकरणाशी काहीही संबंध नाही!

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनार वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र चालवत असल्याचं समोर

Breaking : हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव पंजाब किंग्सच्या सामन्याला मुकणार; Mumbai Indians चं नेतृत्व कोण करणार?

Raj Thackeray: केंद्राचा एकछत्री कारभार विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर घाला... 'NEET' पेपरफुटीवर राज ठाकरेंचा संताप, सरकारवर जोरदार हल्ला

Yerwada Prison Escape : येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेचा कैदी फरार; आठवड्यातील दुसरी घटना, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT