पुणे

पीएमपीच्या ‘पर्यटन बस’ला प्रवाशांची पसंती!

CD

पुणे, ता. २२ : गेल्या दीड वर्षापासून पर्यटन बससेवा प्रवाशांच्या सेवेत असून, दिवाळीच्या सुट्यांमध्ये सहलीचा आनंद लुटण्यासाठी अल्पदरात पीएमपीची बससेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर पर्यटन बससेवेसाठी स्मार्ट एसी इलेक्ट्रिक बस सुरू केली आहे. त्यामुळे पर्यटन बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्यांमध्येही सहलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळाने केले.
बससेवा क्रमांक-१
हडपसर, मोरगाव, जेजुरी, सासवड, हडपसर या मार्गाची बस सकाळी ९ वाजता सुटेल आणि दुपारी ४ वाजता पोहचेल. बसचा पहिला आणि शेवटचा थांबा हडपसर गाडीतळ असे आहे.
बससेवा क्रमांक-२
हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर मंदिर, कोंढणपूर मंदिर, हडपसर असा मार्ग असून, बस सुटण्याची वेळ सकाळी ९ वाजता असून, सायंकाळी ६.३० वाजता पोहचेल.
बससेवा क्रमांक-३
मार्ग डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कन असे असून, बस सुटण्याची वेळ सकाळी ९ वाजता असून, सायंकाळी ५ वाजता पोहचेल. बससेवा क्रमांक-४ चा मार्ग पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, सिंहगड पायथा, पुणे स्टेशन असे असून, बस सुटण्याची वेळ सकाळी ९ वाजता असून, ४ वाजून ४५ मिनिटांनी पोहचेल.
बससेवा क्रमांक-५
मार्ग पुणे स्टेशन, पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणे स्टेशन असा असून, बस सुटण्याची वेळ सकाळी ९ वाजता असून, सायंकाळी ५.३० वाजता पोहचेल.
बससेवा क्रमांक-६
पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडेबोल्हाई मंदिर, छत्रपती संभाजी महाराज समाधी मंदिर (वढू बुद्रुक), रांजणगाव गणपती, भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ, पुणे स्टेशन असा आहे. बस सुटण्याची वेळ सकाळी ९ असून, सायंकाळी ५.३० वाजता पोहचेल.
बससेवा क्रमांक-७
भक्ती शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसावी मंदिर (चिंचवड), प्रतिशिर्डी (शिरगाव), देहूगाव, गाथा मंदिर, आळंदी, भक्ती शक्ती निगडी असा मार्ग असून, बस सुटण्याची वेळ सकाळी ९ वाजता असून, सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पोहचेल.
बससेवा क्रमांक-८
पुणे स्टेशन-डेक्कन जिमखाना, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, इस्कॉन मंदिर कोंढवा रोड, शिवसृष्टी आंबेगाव, स्वामी नारायण मंदिर नऱ्हे-आंबेगाव, पुणे स्टेशन असे बस मार्ग आहेत. बस सुटण्याची वेळ सकाळी ९ वाजता असून, सायंकाळी ७ वाजता पोहचेल.

तिकीट दर किती?
पर्यटन बससेवा क्रमांक १ ते ८ या मार्गातील पर्यटनासाठी प्रतिप्रवासी ५०० रुपये तिकीट दर आहे.

पर्यटन बससेवेबाबत...
बसेसच्या आसन क्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास पाच प्रवाशांच्या तिकीट दरात १०० टक्के सवलत असून, बुकिंग डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी आणि मनपा भवन या पास केंद्रांवर होईल. प्रवाशांना मार्गदर्शन करण्याकरिता प्रत्येक बसमध्ये गाइड सेवकाची नेमणूक केली जाईल. पर्यटन बससेवेचे तिकीट बुकिंग आणि स्थळांसंदर्भातील माहितीकरिता पीएमपीएमएलचे समन्वयक नितीन गुरव यांच्याशी ९८५०५०१८६२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Electricity: येत्या दोन वर्षांत गुजरातपेक्षाही स्वस्त वीज: मुख्यमंत्री फडणवीस, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र अव्वल ठरणार

FIFA World Cup: पुढचा प्रश्न घ्या... रोनाल्डोची मेस्सी, एम्बापेशी तुलना करणाऱ्या प्रश्नावर चिडचिड

Ketan Agrawal Murder Case : सिया लग्न मोडून प्रियकरासोबत पळून का गेली नाही? चेतनने पोलीस तपासात सांगितले धक्कादायक सत्य

२ वर्षांच्या चिमुकल्याला २५ वेळा चावा, २० मिनिटं मारहाण, एकाने केल्या उलट्या; प्ले स्कूलमधील संतापजनक प्रकार

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना लिहिले पत्र

SCROLL FOR NEXT