पुणे: महाराष्ट्र सरकारने जैन अल्पसंख्यक आर्थिक महामंडळ तसेच भगवान महावीर 2550 व्या निर्वाण महोत्सव समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात तसेच अल्पसंख्यांकांना मिळणाऱ्या विविध लाभांवर चर्चा करण्यासाठी पुण्यात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही बैठक येत्या 27 ऑक्टोबर 2024 रोजी (रविवार), दुपारी 3:00 ते 5:00 या वेळेत HND बोर्डिंग, शिवाजीनगर, पुणे येथे होणार आहे. बैठकीत विविध महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात येणार आहेत, ज्यात जैन समाजाच्या विकासासाठी शासनाची भूमिका, अल्पसंख्यकांच्या समस्यांचे निराकरण आणि जिल्हास्तरीय अल्पसंख्यक समितीच्या स्थापनेबाबत चर्चा होईल. याशिवाय भगवान महावीरांच्या 2550 व्या निर्वाण महोत्सवानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनावरही विचारमंथन केले जाणार आहे.
बैठकीचे मुख्य मुद्दे:
प्रस्तावना आणि सुरुवात
अल्पसंख्यांकांच्या समस्या आणि त्यांचे निराकरण
जैन समाजासाठी शासनाची भूमिका
जिल्हास्तरीय अल्पसंख्यक समितीची स्थापना
भगवान महावीर 2550 व्या निर्वाण महोत्सवाचे कार्यक्रम
या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी जैन समाजातील सर्व सदस्यांना या बैठकीत सहभागी होण्या आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीचे आयोजन सकल दिगंबर जैन समाज, पुणे व PCMC यांनी केले असून बैठकीत अतुल शहा, डॉ. प्रकाश जैन बडजात्या, डॉ. कल्याण गंगवाल, सुनील कटारिया , सुरेंद्र गांधी, अन्नासो पाटील, चंद्रकांत पाटील, विजयकुमार लुंगाडे, Adv. योगेश पांडे इत्यादि आयोजक उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.