पुणे

‘बीजे’मध्ये डेंगीच्या विषाणूवर संशोधन

CD

पुणे, ता. २२ ः डेंगी विषाणूवर संशोधन करता यावे तसेच त्यावर लस तयार करता यावी यासाठी ‘बीजे’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डेंगीच्‍या विषाणूवर संशोधन सूरू झाले आहे. त्यानुसार विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्‍वेन्‍सिंग) करण्‍यात येत आहे. त्‍यामध्‍ये चार टप्प्यात ९६ नमुन्यांचे क्रमनिर्धारण करण्यात आले आहे. अभ्‍यासाचे निष्‍कर्ष केंद्र सरकारला पाठवून त्‍यावर लस तयार करता येईल का? याबाबत पुढील नियोजन ठरेल. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाला डेंगीविरोधात प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याच्या दृष्टीने हे संशोधन उपयुक्त ठरेल.
सध्‍या डेंगीवरील लस भारतात उपलब्‍ध नाही. ही लस अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्‍ट्रेलिया या देशांमध्‍ये उपलब्‍ध आहे. परंतु, तेथील विषाणूंचा प्रकार आणि भारतातील विषाणूंचा प्रकार वेगवेगळा असल्‍याने या लसी भारतातील रुग्‍णांवर प्रभावी ठरू शकत नाहीत. तर भारतात डेंगी विषाणू हा आतापर्यंत वेगळा केला गेला नसल्‍याने त्‍याचे उपप्रकार किती आहेत, याची माहिती होणे गरजेचे असते. त्‍यासाठी हे जनुकीय क्रमनिर्धारण होणे गरजेचे आहे. तीच प्रक्रिया आता ‘बी. जे.’च्‍या प्रयोगशाळेत होत आहे. याआधी या प्रयोगशाळेत कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्‍यात आले होते. त्‍याद्वारे ‘डेल्‍टा’ या दुसऱ्या लाटेचा कारणीभूत ठरलेल्‍या कोरोनाचा उपप्रकार असलेल्‍या विषाणूंचा शोध घेतला होता.
प्रयोगशाळेची हीच यंत्रणा आता डेंगी विषाणूंच्या क्रमनिर्धारणासाठी वापरण्‍यात येत आहे. हा अभ्‍यास ‘रॉकफेलर फाउंडेशन’ व ‘पुणे नॉलेज क्‍लस्‍टर’च्या (पीकेसी) सहकार्याने कार्यान्‍वित झाला आहे. दरम्‍यान, कोरोनाप्रमाणेच भारतातही डेंगी विषाणूमध्ये हजारांहून अधिक उत्‍परिवर्तन (म्युटेशन) म्हणजेच वेगवेगळे बदल झालेले आहेत. त्‍यापैकी सध्या भारतात डेंगीच्या केवळ चार ते पाच उत्‍परिवर्तन झालेल्‍या जनुकांची माहिती उपलब्ध आहे. नव्या संशोधनातून डेंगीचे कोणते जीनोम्स विकसित झाले आहेत, याबाबत अभ्यास करणे शक्य होणार आहे.

गेल्‍या महिनाभरापासून बीजे महाविद्यालयामध्‍ये डेंगी विषाणूंचे जनुकीय क्रमनिर्धारण सुरू करण्यात आले आहे. त्‍यानुसार डेंगी पॉझिटिव्‍ह रुग्णांचे नमुने घेतले आहेत. एका टप्प्यात २४ असे चार टप्प्यांमध्ये ९६ नमुन्यांचे क्रमनिर्धारण केले. त्‍यापैकी १५ नमुन्यांमध्ये डेंगी विषाणूंचे चार वेगळे उपप्रकार (सब सिरोटाइप) आढळून आले आहेत. विषाणूंमधील उत्‍परिवर्तनाचा अभ्यास पुढील टप्प्यात केला जाईल.
- डॉ. राजेश कार्यकर्ते, प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, ‘बी. जे.’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT