सनील गाडेकर ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २२ ः सोने खरेदीबाबत नागरिक, बँक आणि गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेला विश्वास, गेल्या तीन वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर घडलेल्या विविध घडामोडी आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने सुरक्षित, पारंपरिकदृष्ट्या असलेले महत्त्व, यामुळे सोन्याला असलेली मागणी वाढतच आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत सोन्याचा भाव २८ हजार रुपयांनी वाढला आहे. वस्तू महाग झाली की, त्याची मागणी काहीशी घटत असल्याचे अनेक सेवा, वस्तू किंवा उत्पादनांच्या बाबतीत घडते. मात्र सोन्याच्या भावाप्रमाणे त्याची मागणीदेखील वाढत आहे.
महिन्यात साडेसात हजारांनी महागली
जानेवारी महिन्यात चांदीचा प्रतिकिलो भाव ७४ हजार ६०० रुपये होता. त्यात तीन हजार ९६० रुपयांची घट होऊन फेब्रुवारीमध्ये चांदी ७० हजार ६४० रुपये प्रतिकिलो झाली होती. तर एक ते १५ जानेवारीदरम्यान चांदी दोन हजार रुपयांनी स्वस्त झाली होती. त्यानंतर सातत्याने चांदीचा भाव कमी होत गेला होता. मात्र दरम्यानच्या काळात चांदीचे भाव पुन्हा वाढायला सुरुवात झाली. गेल्या महिनाभरात चांदीचा भाव सात हजार ५०० रुपयांना वाढला आहे. त्यामुळे चांदी एक लाख रुपयांच्या घरात पोचली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर चांदी लवकरच एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडेल, अशी शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
तेजी कायम राहणार
सोन्याचे भाव ज्या प्रमाणात वाढले आहेत, त्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता कमी आहे. गेल्या दोन वर्षांतील वाढ लक्षात घेता, भाव यापुढेदेखील तेजीत राहू शकतात. सोने अपेक्षित असलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेत ७५ हजार रुपयांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे यापुढेदेखील असेच होण्याची शक्यता आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.
सोन्याचे भाव वाढण्याची प्रमुख कारणे
- अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून वाढलेली खरेदी
- रशिया-युक्रेन युद्ध
- यूएस व युरोपियन बाजारपेठांतील मंदीचे वातावरण
- जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी
- वाढत्या व्याजदरातील अस्थिरता
- यूएस आर्थिक स्थितीत घट
- अपरिहार्य कारणांमुळे वाढलेली खरेदी
- इराण आणि इस्राईलमधील युद्धजन्य परिस्थिती
- गुंतवणुकीच्या दृष्टीने सुरक्षित
- पारंपरिकदृष्ट्या असलेले महत्त्व
- दागिन्यांना मिळणारी पसंती
सोन्याचा भाव (रुपयांत) ः (१० ग्रॅम)
तारीख - २४ कॅरेट - २२ कॅरेट - चांदी (१ किलो)
२२ ऑक्टोबर २०२२- ५१०५६ - ४८७८१ - ५८९००
२२ जानेवारी २०२३ - ५७३१८ - ५४७६४ - ६९४००
२२ एप्रिल २०२३ - ६०५५०- ५६३५३ - ७५००५
२२ जुलै २०२३ - ५९७९२ - ५५६४८ - ७५१००
२२ ऑक्टोबर २०२३ - ६११२५ - ५६८८९ - ७३१००
२२ जानेवारी २०२४ - ६२७७ - ५८४२१ - ७१८५०
२२ एप्रिल २०२४ - ७३६६९ - ६८५६४ - ८३०००
२२ जुलै २०२४ - ७३५२८- ६८४३२ - ८९२५०
२२ऑगस्ट २०२४ - ७२०६४- ६६१७७ - ८५८००
२२ सप्टेंबर २०२४ - ७४८०८ - ६८६९१ - ८९३५०
२२ ऑक्टोबर २०२४ - ७८७८० - ७२३४५ - ९८५००
वाढलेला भाव - २७,७२४ -२३५६४ - ३९६००
(स्रोत- कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.