पुणे, ता. १ : ‘‘गंगा, यमुना, सिंधू, कृष्णा, कावेरी, गोदावरी या नद्यांचे राष्ट्रगीत आपण नेहमी गातो; पण त्यांच्या आरोग्याची काळजी घेत नाही. नद्यांचे आरोग्य आणि आपले आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहे, हे आपण विसरलो आहोत. नदीचे आरोग्य बिघडले तर भारताचे राजकारण, सभ्यता, संस्कृती आणि सामाजिक व आर्थिक स्थिती बिघडेल. हे टाळण्यासाठी उपाय योजले पाहिजेत,’’ असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.
डॉ. सिंह लिखित आणि सकाळ प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘निसर्ग आणि माणूस’ या पुस्तकाचे प्रकाशन तरुण भारत संघाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात उदयपूरच्या जनार्दन राय नागर राजस्थान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. कर्नल एस. एस. सारंगदेवोत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पुस्तकाचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्रीराम पवार, सकाळ प्रकाशनाचे सरव्यवस्थापक आशुतोष रामगीर, तरुण भारत संघाचे रमेश शर्मा उपस्थित होते.
तरुण भारत संघाच्या माध्यमातून आणि जलकार्यातून झालेल्या सामाजिक विकासाची माहिती ‘सकाळ’च्या ‘सप्तरंग’ या पुरवणीतील ‘निसर्ग आणि माणूस’ या सदराच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचली. या सदरावर आधारित हे पुस्तक असून जलचळवळीतील कार्यकर्त्यांसाठी आणि पाण्याचे धोरण ठरवणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास डॉ. सिंह यांनी व्यक्त केला. तरुण भारत संघाच्या आजपर्यंतच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
पुस्तकाविषयी
नाव : निसर्ग आणि माणूस
लेखक : डॉ. राजेंद्र सिंह
पृष्ठे : १३०
किंमत : रुपये २२५
अधिक माहितीसाठी संपर्क : ८८८८८४९०५० | ९८८१५९८८१५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.