पुणे

विद्यार्थ्यांना नामांकित वैज्ञानिक संस्थांना भेट देण्याची संधी ः गजानन पाटील

CD

पुणे, ता. ५ ः ‘‘जिल्हा परिषदेच्या शाळांतील २३५ विद्यार्थी इस्रो आणि नासा संस्थांच्या भेटीसाठी आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिकशास्त्र केंद्रात (आयुका) मुलाखती देणार आहेत. मात्र, त्यातील ७५ विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. परंतु, इतर विद्यार्थ्यांनाही देशातील नामांकित वैज्ञानिक संस्थांना भेट देण्यासाठी पाठविले जाणार आहे. ज्यामध्ये आयसरसारखी संस्था, तसेच राष्ट्रपती भवनालाही भेट देण्यात येणार आहे,’’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सोमवारी दिली.
जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या उपक्रमासाठी दोन टप्प्यांत परीक्षा घेण्यात आली. आता आयुकाकडून मुलाखती घेऊन अंतिम ७५ विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. यापैकी २५ विद्यार्थ्यांची नासासाठी आणि ५० विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ भेटीसाठी निवड होईल.
पाटील म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना नासाला पाठविण्यासाठी निवडप्रक्रिया झाल्यानंतर व्हिसा आणि पासपोर्टसाठी कागदपत्रे गोळा केली जातील. प्रशासनाकडून ही प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांना नासाला पाठविले जाईल. या उपक्रमासाठी साधारण अडीच कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. अमेरिकेतील नासा आणि देशातील ‘इस्रो’ या अंतराळ संशोधन संस्थांच्या भेटीसाठी विद्यार्थ्यांची निवडप्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, निवड न झालेल्या उर्वरित विद्यार्थ्यांनाही देशातील नामांकित वैज्ञानिक संस्थांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. एकही गुणवंत विद्यार्थी संधीपासून वंचित राहू नये, हा आमचा प्रयत्न आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satyapal Malik Death Cause: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन; 'या' गंभीर आजाराने होते ग्रस्त, नेमकं काय घडलं?

Amit Shah Record: अमित शहांनी नोंदवला सर्वाधिक काळ गृहमंत्री पदावर राहण्याचा विक्रम!

Latest Maharashtra News Updates Live : वांगणी रेल्वे फाटक रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यामुळे वाहन चालवणंही कठीण

Video : पाठीमागून गपचूप आला मिठी मारली अन् छातीवर...; रस्त्यावर महिलेसोबत अश्लील कृत्य, धक्कादायक घटनेचे फुटेज व्हायरल, पाहा व्हिडीओ

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत ढगफुटीमुळे पूर, मलब्याने घरे उद्ध्वस्त! अनेक लोक अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू...

SCROLL FOR NEXT