पुणे

जयकर ज्ञानस्रोत केंद्रामध्ये उद्यापर्यंत ग्रंथ प्रदर्शन

CD

पुणे, ता. ४ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्रोत केंद्रातर्फे ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन बुधवारपर्यंत (ता. ६) सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते झाले.
प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. गोसावी यांनी ग्रंथप्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला प्रत्यक्ष भेट देऊन प्रदर्शनात उत्तम ग्रंथांचा समावेश असल्याचे नमूद केले. विद्यापीठातील सर्व विद्यार्थी, संशोधक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहनही डॉ. गोसावी यांनी केले. या ग्रंथ प्रदर्शनामध्ये देशभरातील ४०हून अधिक ग्रंथविक्रेते आणि प्रकाशक सहभागी झाले असून, देश-विदेशात प्रकाशित झालेल्या विविध विषयांवरील वर्ष २०२२ नंतर प्रकाशित झालेल्या ग्रंथांचा समावेश आहे. विविध विषयांवरील ग्रंथ पाहण्याची आणि आपले ज्ञान समृद्ध करण्याची ही एक अनोखी संधी आहे. या संधीचा सर्व अभ्यासक, संशोधक, वाचकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जयकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. संजय देसले यांनी केले. हे प्रदर्शन बुधवारपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जयकर ज्ञानस्रोत केंद्राच्या वाचनकक्षामध्ये सर्वांसाठी खुले राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bribe Case Kolhapur : राबून खाणाऱ्या स्टॉल धारकांना भिती घालून पैसे लाटायचा, भ्रष्ट अधिकारी रंगेहात सापडला अन्, कोल्हापूर महापालिकेत एकच खळबळ

Maharashtra Kesari: गदा सरकारजमा करणार! एकाच 'महाराष्ट्र केसरी'साठी चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन

Sangola Murder Case: मुलानेच केला जन्मदात्याचा खून; सांगोला तालुक्यात उडाली खळबळ, आईची फिर्याद, धक्कादायक कारण आलं समाेर!

Latest Marathi News Live Update : मुंबईत दोनदिवसीय 'भक्तीचा महाकुंभ’; 'भक्ती-शक्ती व्यासपीठा'तर्फे संत आणि सद्‍गुरूंच्या पादुकांच्या दर्शनाची संधी

Labour Shortage Hits Traditional Harvesting: वाढत्या उन्हामुळे मजूर टंचाई; गहू काढणीसाठी आधुनिक यंत्रांवर शेतकऱ्यांचा भर

SCROLL FOR NEXT