पुणे

किचन गार्डन कार्यशाळा

CD

किचन गार्डनद्वारे भाजीपाला, सक्युलंन्ट्स व कॅक्टस, फोलिएज व फुलझाडांची तसेच इतर फळझाडांची लागवड करता येते. रोजच्या खाण्यात ताजा आणि विषमुक्त भाजीपाला व शोभेची इतर झाडे घरच्या घरी कशी लावू शकतो, याविषयी सखोल मार्गदर्शन करणारी कार्यशाळा ११ व १२ ऑक्टोबर रोजी आयोजिली आहे. घरातल्या घरात लागवड केलेल्या सेंद्रिय भाज्यांचे आरोग्यदायी फायदे, शिवाय वर्षभर बाग फुललेली कशी राखावी, बागेचे आर्थिक गणित कसे बसवावे, बागेचे नियोजन व डिझाइन, लागवडीसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी, रोपांची निवड, माती व मातीविरहित लागवड करण्याची पद्धत, खत व पाणी व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण याविषयी माहिती दिली जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करणारे अनुभवी तज्ज्ञ कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत.

ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रम माहिती सत्र
सर्वाधिक रोजगाराच्या संधी असणाऱ्या कृषी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक वर्षाचा ‘पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम लवकरच सुरू होत आहे. इंडस्ट्री तज्ज्ञांनी तयार केलेल्या या अभ्यासक्रमाद्वारे ज्या विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यात उद्योजकता विकास निर्माण करण्यावर तसेच ज्यांना नोकरी ही प्राथमिकता आहे अशांमध्ये उत्तम नोकरी मिळवण्याचे कौशल्य निर्माण करण्यावर भर दिला जातो. कृषी व संलग्न वा अन्य कोणत्याही विषयातील पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असून गरजू विद्यार्थ्यांना सुमारे ६० हजारांपर्यंत शिष्यवृत्ती मिळवण्याची संधीदेखील यात उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच्या करिअर संधी, स्टार्टअपच्या संधी अशी सर्व प्रकारची माहिती देणारे विनामूल्य सत्र १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० वाजता आयोजिले आहे.

आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण
आजच्या स्पर्धात्मक आणि जागतिकीकरणाच्या युगात व्यापाराला सीमारेषा राहिलेल्या नाहीत. भारतीय उत्पादने जगभरात पोहोचू शकतात, फक्त योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि धोरणे असणे आवश्यक आहे. या पार्श्‍वभूमीवर १३ ऑक्टोबरपासून ‘आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन’ हे ऑनलाइन प्रशिक्षण आयोजिले आहे. प्रशिक्षणात EXIM धोरण, IncoTerms, शिपिंग आणि कंटेनर व्यवस्थापन, दररचना व आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, तसेच पॅकेजिंग, लेबलिंग, डिजिटल टूल्स आणि सरकारी योजना यावर अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. वाटाघाटी करण्याच्या कौशल्यापासून ते आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशी करावी, या सर्व बाबींचा प्रशिक्षणात समावेश असणार आहे. स्टार्टअप्स, लघुउद्योजक, व्यापारी आणि नवउद्योजक यांच्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल.

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२


रिअल इस्टेट एजंटसाठी डिजिटल मार्केटिंग
खास रिअल इस्टेट एजंटसाठी केंद्रित २० तासांची डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा १३ ऑक्टोबरपासून आयोजिली आहे. रिअल इस्टेट एजंटना स्वतःच्या अथवा ते ज्या बांधकाम व्यवसाय कंपनीसाठी काम करतात त्यांच्या व्यवसायाची मार्केटिंग करायची असेल तर आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग एवढे प्रभावी मार्केटिंग तंत्र उपलब्ध नाही. कोणत्याही कंपनीच्या किंवा संस्थेच्या प्रगतीत मार्केटिंग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. बांधकाम व्यवसाय क्षेत्रात कंपनीचे उत्पादन विकण्यासाठी हे डिजिटल मार्केटिंगचे तंत्र कसे वापरावे तसेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया मार्केटिंग, मोबाइल मार्केटिंग, डिस्प्ले ॲडव्हर्टायझिंग अशा विविध तंत्रांचा उपयोग डिजिटल मार्केटिंग कसे करावे, याचे प्रगत मार्गदर्शन प्रात्यक्षिकासहित कार्यशाळेत होणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ४,९९९ अधिक जीएसटी.
संपर्क : ८४८४८२२८५५, ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताचा पहिला पराभव, अव्वल क्रमांकाची संधी हुकली! वोल्वार्ड्ट - डी क्लार्कच्या आक्रमणाने द. आफ्रिकेचा विजय

Maharashtra Ranji Squad: पृथ्वी शॉची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड; कर्णधारपदाची ऋतुराज नाही, तर 'या' खेळाडूकडे जबाबदारी

PM Modi Congratulates Trump : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींकडून ट्रम्प यांचे अभिनंदन अन् ट्रेड डीलवरही झाली चर्चा

Mumbai Metro: पहिल्याच दिवशी ‘मेट्रो ३’मधून लाखो प्रवाशांचा प्रवास, पण समस्यांचा पाढा वाचला, वाचा सविस्तर...

INDW vs SAW: पोरीनं काय भारी कॅच घेतलाय! भारताच्या क्रांतीने पकडला वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम झेल; पाहा Video

SCROLL FOR NEXT