पुणे

जुन्नर, शिरूर, मावळ, वेल्हे, मुळशी, भोर, खेड महिलाराज

CD

पुणे, ता. ९ : पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या १३ पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये १३ पैकी ७ पंचायत समितीच्या कारभाराची सूत्रे महिलांच्या हाती आली आहेत.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. सभापती पदासाठी ही सोडत अडीच वर्षे कालावधीसाठी असणार आहे, अशी माहिती यावेळी जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते यांनी दिली.
सोडतीच्या वेळी प्रारंभी २००२ पासूनचे पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण कसे पडले व शासन निर्णयामध्ये आगामी निवडणुकीत आरक्षण कसे राहील, हे जाहीर करण्यात आले. तसेच पंचायत समितीनिहाय अनुसूचित जाती व जमाती लोकसंख्या व त्यानुसार उतरत्या क्रमाने टाकले जाणारे आरक्षण, याचबरोबर ज्या पंचायत समितीमध्ये तीन वेळा आरक्षण पडले, अशा पंचायत समिती शासन निर्णयानुसार वगळून अन्य आरक्षण सोडतीने काढण्यात आली.
नागरिकांचा मागासवर्ग, अनुसूचित जमाती महिला, दोन सर्वसाधारण महिला हे आरक्षण नियमानुसार काढण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आरक्षण कसे पडले त्याचा खुलासा करण्याची मागणी केली. त्यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रथम त्यांच्या शंकांचे निरसन करा व नंतरच पुढील आरक्षण प्रक्रिया सुरू करा, अशा सूचना केल्या. त्यामुळे कुठलाही गोंधळ व आक्षेप न नोंदवता ही प्रक्रिया पूर्ण झाली.

पंचायत समितीनिहाय सभापती आरक्षण
१. इंदापूर : अनुसूचित जाती
२. जुन्नर : अनुसूचित जमाती महिला
३. दौंड : नागरिकांचा मागासवर्ग
४. पुरंदर : नागरिकांचा मागासवर्ग
५. शिरूर : नागरिकांचा मागासवर्ग महिला
६. मावळ : नागरिकांचा मागासवर्ग महिला
७. वेल्हे : सर्वसाधारण महिला
८. मुळशी : सर्वसाधारण महिला
९. भोर : सर्वसाधारण महिला
१०. खेड : सर्वसाधारण महिला
११. हवेली : सर्वसाधारण
१२. बारामती : सर्वसाधारण
१३. आंबेगाव : सर्वसाधारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Layoffs 2025: टाटांच्या कंपनीत चाललंय काय? दर तासाला 9 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं; कामगार संघटना आक्रमक

Kabul Blast : अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये भीषण स्फोट; पाकिस्तानचा अर्ध्या रात्री एअर स्ट्राईक ?

Latest Marathi News Live Update : नागपुरात ओबीसींचा आज महामोर्चा; यशवंत स्टेडियम येथून होणार सुरुवात

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा, लाखोंची रोकड लुटली; तिघांना घेतलं ताब्यात

Honey Trap MLA Shivaji Patil : कोल्हापुरातील आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न, ओळख वाढवून लाखो रुपयांची मागणी; चॅटींगही केलं

SCROLL FOR NEXT