
कोल्हापुरातील आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न
esakal
तीन ठळक मुद्दे (Highlights):
हनी ट्रॅपचा प्रयत्न: चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना ओळखीच्या महिलेने हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा धक्कादायक प्रयत्न केला.
खंडणी मागणी: संबंधित महिलेने आधी लहान रक्कम घेतल्यानंतर अश्लील फोटो दाखवत आमदारांकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितली.
गुन्हा दाखल: या प्रकरणी ठाणे पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Kolhapur Political News : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदार संघातील आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा धक्कादायक प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे वर्षभरापूर्वी एका महिलेची आमदार पाटील यांच्याशी ओळख झाली होती. त्या महिलेनं या काळात सतत चॅटिंग करून ओळख वाढवली, तसेच कधी एक लाख, कधी दोन लाख रुपयांची मागणी करून रक्कम घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.