पुणे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षे कारावास

CD

पुणे, ता. १० : कोंढवा परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला शिवाजीनगर सत्र न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.
अनिस नैस महम्मद (वय ३६, रा. महम्मदवाडी, पुणे) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये घडलेल्या या प्रकरणात आरोपीने परिसरात खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून आपल्या खोलीत नेले. ती अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. याबाबत मुलीच्या कुटुंबीयांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि ‘पोक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सबळ साक्षीपुराव्यांनंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी आरोपीला शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वराज पाटील यांनी केला. त्यांनी आरोपीविरुद्ध ठोस पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने प्रभावीपणे बाजू मांडली. सरकारी पक्षाचे वकील नितीन कोंघे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर आणि कोर्ट पैरवी अधिकारी महेश जगताप, विजय माने, अंकुश बनसोडे, अमोल हिरवे, मयूर मोरे यांनी या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीबद्दल पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी तपास पथकासह कोर्ट पैरवी अधिकाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

Chandoli Dam Tourists : चांदोली धरणावर दारू पिऊन धिंगाणा घालताय? सावधान! पोलिस, धरण प्रशासन ॲक्शन मोडवर; मद्यधुंद पर्यटकांवर अंकुश

Ambenali Ghat Accident : महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना ! स्कॉर्पियो ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

SCROLL FOR NEXT