पुणे

देवेंद्र फडणवीस आज घेणार पक्ष संघटनेची झाडाझडती - पुण्यात पश्‍चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक

CD

पुणे, ता. १० ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाल्यानंतर संघटनेची तयारी काय आहे? याची झाडाझडती घेण्यासाठी उद्या (ता. ११) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात पश्‍चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काय तयारी केली आहे, याचे उत्तर पदाधिकाऱ्यांना द्यावे लागणार आहे.
गेल्या तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता या निवडणुका घेण्यासाठीची लगबग सुरु झाली आहे. जिल्हा परिषद, महापालिका यासह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना अंतिम झाली आहे. जानेवारीच्या अखेरपर्यंत सर्व निवडणुका पार पडून निकाल जाहीर होतील, अशी शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता या निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरवात केली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, प्रदेश पातळीवरील पदाधिकारी, शहर व जिल्हा कार्यकारिणीतील महत्त्वाचे पदाधिकारी यांची बैठक डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे सकाळी १० पासून होणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत फडणवीस थेट पदाधिकाऱ्‍यांशी संवाद साधणार आहेत. भाजपने काही आठवड्यांपूर्वी नवे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष जाहीर केले. त्यानंतर पक्ष संघटनेच्या रचनेसह पदाधिकारी पक्ष मजबूत करण्यासाठी काय करत आहेत?, सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी काय केले? याची उत्तरे पदाधिकाऱ्‍यांना द्यावी लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT