पुणे

पुणे महापालिकेतर्फे ७१ हजार नागरिकांची आरोग्‍य तपासणी

CD

पुणे, ता. ११ : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ पार पडले. याद्वारे शहरात ७१ हजार ३२१ महिला व नागरिकांची आरोग्‍य तपासणी करण्‍यात आली. यामध्‍ये महिलांच्या आरोग्यविषयक तपासण्या, पोषण, मानसिक आरोग्य तसेच विविध रोगांचे लवकर निदान या बाबींवर विशेष भर देण्यात आला.
या अभियानादरम्यान शहरात ३१२ आरोग्य शिबिरे आयोजित केली होती. त्‍यामध्‍ये ७१ हजार ३२१ महिला आणि नागरिकांनी सहभाग घेतला. या शिबिरांत ५४ हजार २३३ जणांना उच्च रक्तदाब, ५१ हजार ९३३ जणांना मधुमेह आणि ५३ हजार ६१० महिलांच्‍या कर्करोग (स्तन, गर्भाशय, मुख) तपासण्या करण्यात आल्या. तसेच चार हजार ३३५ गर्भवतींची तपासणी, ३६ हजार २४९ रक्तक्षय तपासण्या आणि चार हजार ७५२ बालकांचे लसीकरण करण्यात आले.

क्षयरोग नियंत्रणाच्या दृष्टीने २८ हजार ७०० क्षयरोग तपासण्या घेण्यात आल्या आणि नऊ निक्षय मित्र नोंदणी झाली. या अभियानादरम्यान ६७ हजार ८३६ नागरिकांना समुपदेशन सेवा देण्यात आल्या. याशिवाय १० रक्तदान शिबिरे आयोजित करून ३१५ रक्तदात्यांचे रक्तसंकलन करण्यात आले. त्‍याचबरोबर आयुष्मान भारत या ‘पीएमजेएवाय’ योजनेंतर्गत आठ हजार ३०४ कार्डांचे वितरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्मृती मानधना - पलाश मुच्छलचं लग्न रद्द, स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती; म्हणाली...

Goa Night Club Fire Incident : गोव्यातील सिलिंडर स्फोट प्रकरणी मोठी कारवाई ! नाईट क्लब मालकाला अटक, आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू

Viral Video: भक्त हत्तीणीवर अभिषेकासाठी पाण्याचा वर्षाव करत होते, एका कर्मचाऱ्याने थांबवलं तर हत्तीणीने उचलून फेकलं!

Latest Marathi News Live Update : "इंडिगोच्या मक्तेदारीला परवानगी देणाऱ्या सरकारचे हे अपयश नाही का?..."- पवन खेरा

Sharad Pawar: ‘आघाडी’चे सर्वाधिकार पवारांना! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT