पुणे

बूथ यंत्रणा मजबूत करा

CD

पुणे, ता. ११ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १५ नोव्हेंबर नंतर टप्प्याटप्प्याने जाहीर होतील. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. ज्या ठिकाणी बूथ यंत्रणा मजबूत नाही तेथील कार्यकर्त्यांना मुळ प्रवाहात आणा. आपल्यावर कितीही टोकाची टीका झाली तरी तुम्ही पातळी सोडू नका, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीच्या निमित्ताने भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांचे रणशिंग फुंकले आहे.
पुण्यात शनिवारी (ता. ११) पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील सुमारे ८०० पेक्षा जास्त पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संवाद साधला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश महामंत्री राजेश पांडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाचही जिल्ह्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील, शहरातील बूथ यंत्रणा कशी आहे, पदाधिकाऱ्यांचे म्हणणे काय आहे, हे जाणून घेतले. बहुतांश सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपसाठी अनुकूल स्थिती असल्याचे सांगितले. तर काहींनी विशेषतः ग्रामीण भागात भाजपला मित्रपक्षांसोबत युती करावी लागेल, असे सांगितले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तुमच्‍या भागात कशी स्थिती आहे याचा विचार करा, आरक्षणे कसे पडले आहेत याचा विचार करून तुम्ही स्वतंत्र लढायचे की महायुती करायची याचा निर्णय घ्या, असे सांगितले.
१५ नोव्हेंबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यास सुरुवात होईल. प्रत्येक निवडणुकीमध्ये २० दिवसांचे अंतर असणार आहे. पहिल्या टप्प्यात नगर पालिका, नगर परिषद यांच्या निवडणुका होतील. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील. तर सर्वात शेवटी राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत सांगितले.

पुण्यात १२५ नगरसेवकांचा दावा
पुणे जिल्ह्याच्या बैठकीत पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांनी येथील पक्ष बांधणीची माहिती दिली. भाजपने शहरात स्वतंत्र निवडणूक लढवली तरी किमान १०५ नगरसेवक निवडून येऊ शकतात. १५ ते २० जागांवर लक्ष देऊन काम केल्यास व योग्य उमेदवार दिला तर आपण किमान १२५ नगरसेवक निवडून आणू शकतो, असा विश्‍वास शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी या बैठकीत व्यक्त केला. तर, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी भाजपसाठी काही जागा अवघड आहेत, तेथे अन्य पक्षातील चांगल्या कार्यकर्त्यांचा प्रवेश करून घेतला जाऊ शकतो, असे स्पष्ट केले. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड येथे आपल्याला चांगले वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी व्यवस्थितपणे काम करावे, आपल्याला मोठा विजय मिळू शकतो, असे बैठकीत सांगितले.

पश्‍चिम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था
नगर पालिका - १०
नगर परिषद - ४७
पंचायत समिती - ५८
जिल्हा परिषद - ५
महापालिका - ६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News : भीषण अपघात ! म्हशीला वाचवताना ४ वाहनांची धडक; ४ ठार, अनेक जखमी

३७ वर्षांच्या संसारात कधीही अशोक सराफ 'ही' गोष्ट निवेदितांसमोर बोलले नाहीत; म्हणाल्या, 'नंतर त्याला विचारल्यावर...'

CM Yogi Adityanath : सीएम योगींच्या 'स्वदेशी अभियाना'ला नवी भरारी; 'स्वदेशी मेळ्यां'मुळे कारागिरांची दिवाळी होणार समृद्ध!

Latest Marathi News Live Update : साखर उद्योगावरील चर्चेसाठी शरद पवार आणि अजित पवार आज पुण्यात एकत्र

Afghanistan Pakistan Clash : अफगाणिस्तानने घेतला हवाई हल्ल्याचा बदला, पाकिस्तानचे १२ सैनिक ठार; अनेक चौक्यांवर तालिबानचा ताबा

SCROLL FOR NEXT