पुणे

लिंक्डइन ऑप्टिमायझेशन प्रशिक्षण

CD

पुणे, ता. १२ : स्पर्धेच्या युगात नोकरीच्या संधी शोधण्यासाठी, इंडस्ट्री प्रोफेशनलशी जोडून राहण्यासाठी तसेच वैयक्तिक ब्रँड तयार करण्यासाठी लिंक्डइन या माध्यमाचा प्रभावी वापर करण्यात येतो. मात्र काहींना हे माध्यम कसे वापरावे व आपल्या करिअरची वाढ कशी करावी हे समजत नाही. त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण १५ ऑक्टोबरला आयोजिले आहे. यात वैयक्तिक व व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक स्ट्रॉन्ग लिंक्डइन प्रोफाइल कशी तयार करावी, नेटवर्क विस्तारण्यासाठी आणि लिंक्डइनच्या विविध टूल्सचा लाभ घेण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या याबद्दल तसेच लिंक्डइनची वैशिष्ट्ये व साधने प्रभावीपणे समजून घेणे आणि त्यांचा वापर करणे, प्रमुख उद्योग व्यावसायिकांशी जोडण्यासाठीचे नेटवर्क धोरण आखणे, करिअरच्या प्रगतीसाठी आणि वैयक्तिक ब्रँडिंगसाठी लिंक्डइन प्रोफाइल ऑप्टिमाइझ करणे आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.

बांधकाम व्यवसाय पर्यवेक्षक प्रशिक्षण
स्थापत्य अभियांत्रिकीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली व्यक्तीही योग्य प्रशिक्षणानंतर बांधकाम उद्योगात आपला व्यवसाय सुरू करू शकते अथवा करिअर घडवू शकते. या पार्श्वभूमीवर ३० दिवसांचे प्रगत बांधकाम पर्यवेक्षक (कन्स्ट्रक्शन सुपरवायझर) प्रशिक्षण १५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. यामध्ये बांधकाम उद्योगात नोकरीची शक्यता वाढवणारे, स्थापत्य अभियांत्रिकीचे प्रगत ज्ञान देणारे, प्रात्यक्षिकावर आधारित प्रशिक्षण देणार आहे. बांधकाम क्षेत्र व साहित्याचा परिचय, रेखाचित्राचे वाचन व प्रत्यक्ष साइटवर सराव, क्षेत्र भेटी, प्रकल्प पूर्वतयारी, कंत्राटदाराच्या कामाची पद्धत, अंदाज व खर्च नियोजन, बांधकाम उद्योगातील १४ पायऱ्या, सुरक्षिततेसाठी खबरदारी व वेळेचे व्यवस्थापन इत्यादी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२

शेतकरी कंपनी नोंदणी सेवा
केंद्र तसेच राज्य सरकारद्वारे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालाचे मूल्यवर्धन व मार्केटिंग करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. सिमासेस लर्निंगद्वारे (एसआयआयएलसी) राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी विविध प्रकारच्या सेवा, मार्गदर्शन एक-खिडकी पद्धतीने उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. यापैकी एक सेवा म्हणजे शेतकरी कंपनीची नोंदणी सेवा. कंपनीची नोंदणी योग्यप्रकारे केली गेली, कंपनीचे नियम-पोटनियम हे सर्वसमावेशक, व्यापक व परिपूर्ण अभ्यासाने बनवले गेले तर नोंदणीनंतरच्या सुरूवातीच्या काळातील व्यवसाय तसेच भांडवल उभारणीतील मर्यादा-अडचणी टाळणे शक्य होते, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याची पात्रताही तयार होत राहते. या पार्श्वभूमीवर सिमासेस लर्निंगने अनुभवी सीए, सीएस, कृषी व्यवसाय मार्गदर्शकांच्या माध्यमातून शेतकरी कंपनीची नोंदणी सेवा उपलब्ध केली आहे.
संपर्क : ८९५६७१२६३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

माेठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शनमोडवर; आमदार संग्राम जगताप यांना नोटीस देणार; नेमकं काय प्रकरण?

Barshi fraud:'रामगिरी शुगर्स कारखान्याची जमीन गहाण'; २ कोटी १० लाखाची फसवणूक, बार्शी पोलिसांत दोन महिलांसह सात जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT