पुणे

बावधन-कोथरूड सांस्कृतिक महोत्सव उत्साहात

CD

पुणे, ता. ४ ः विविध चर्चासत्रे, सांगीतिक-सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार सोहळ्याचा समावेश असलेला ‘बावधन-कोथरूड सांस्कृतिक महोत्सव’ उत्साहात साजरा झाला. महोत्सवाचे उद्‍घाटन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले; तर खासदार सुनेत्रा पवार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांच्या उपस्थितीत सांगता झाली.
या महोत्सवात ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांचा ‘बावधन-कोथरूड भूषण पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. चंद्रशेखर बावनकुळे, सुनेत्रा पवार, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, रवींद्र वंजारवाडकर, माजी नगरसेविका मोनिका मोहोळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
बावनकुळे म्हणाले, ‘‘हा महोत्सव कला, साहित्य, संगीत आणि विचारांना चालना देणारा उपक्रम ठरला आहे. महोत्सवाच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना संधी मिळत असून, महाराष्ट्राच्या संस्कृतीला अधिक बळ मिळाले आहे.’’ माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्यातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बावधनच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे शनिवारी (ता. १) आणि रविवारी (ता. २) हा महोत्सव झाला. या महोत्सवात मधुवंती बोरगावकर, जसराज जोशी, जयदीप वैद्य, शिल्पा पुणतांबेकर, सावनी दातार-कुलकर्णी आणि जसराज अभ्यंकर यांचे गायन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT