पुणे

दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीला हवी गती

CD

पुणे, ता. ४ : राज्यात बहुप्रतीक्षेत असणाऱ्या शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतरही लाखो उमेदवार दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र ही प्रक्रिया कासव गतीने सुरू असून दुसऱ्या टप्प्या सर्व व्यवस्थापनांमधून जवळपास १० हजार उमेदवारांना संधी मिळण्याची अपेक्षा आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने शिक्षक भरतीबाबत अधिक स्पष्टता मिळण्याची अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त होत आहे.
राज्यात तब्बल वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गेल्याचवर्षी शिक्षक भरतीचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला. शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यात
शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळांमध्ये मुलाखतीशिवाय जवळपास ११ हजार ८५ नवीन शिक्षकांची भरती जाहीर केली. परिणामी त्याआधी १० ते १२ वर्षांपासून भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांची शिक्षक म्हणून भरती झाली आहे. पवित्र पोर्टलमार्फत ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’नुसार मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन प्रकारातील जाहिरातीसाठी उमेदवारांकडून पहिल्या टप्प्यात अर्ज मागून घेण्यात आले. शिक्षक भरती प्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्थेतील आणि मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील रिक्त जागांसाठी उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात आली. शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यात एकूण २१ हजार ६७८ जागांपैकी मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ पदे होती. त्यातील ११ हजार ८५ उमेदवारांची शिक्षक म्हणून निवडीसाठी शिफारस करण्यात आली. परंतु, शाळांची बिंदू नामावली अद्याप अद्ययावत झालेली नसणे, शाळांकडून पवित्र पोर्टलवर अद्याप शिक्षक भरतीच्या जाहिराती अपलोड करण्यात आलेल्या नसणे, यामुळे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती रखडली आहे.


दुसऱ्या टप्प्यात जास्तीतजास्त खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील रिक्त जागांवर शिक्षक भरती होणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे ‘पेसा’क्षेत्रातील रिक्त असलेल्या तब्बल आठ हजारांपेक्षा जास्त जागा आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षण सेवक आणि शिक्षकांच्या रिक्त जागा अधिवेशनात मंजूर करून त्या पदभरतीसाठी पवित्र पोर्टलचा सूचना देण्यात याव्यात. विशेष तरतूद म्हणून खासगी व्यवस्थापनांसह सर्व व्यवस्थापनांच्या १०० टक्के जागांवर शिक्षक भरती होण्याबाबत अधिवेशनात निर्णय व्हावा.
- संदीप कांबळे, अध्यक्ष, युवा शैक्षणिक व सामाजिक न्यास संघटना

आकडे बोलतात
- पहिल्या टप्प्यात : ११ हजार ८५ शिक्षकांची भरती पूर्ण
- दुसऱ्या टप्प्यात : १० हजार जागांवर शिक्षक भरती होण्याची अपेक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आमदारकीच्या 9 जागांसाठी धूमशान, निवडणूक आयोगाकडून मतदान अन् मतमोजणीची तारीख जाहीर

Hasan Mushrif vs Shivaji Patil : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटलांमध्ये बिनसलं, मुश्रीफांवर गंभीर आरोप करत अप्रत्यक्ष सतेज पाटलांवर टीका

Latest Marathi News Live Update : विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू

Temple Travel: रेन अलर्ट देणारे ‘मान्सून’ मंदिर! पाऊस येण्याआधीच छतातून टपकतात थेंब, विज्ञानाला न सुटलेले कोडे..

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

SCROLL FOR NEXT