विद्येचे प्रांगण
नू. म. वि. मुलींच्या प्रशालेत विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन
पुणे, ता. ४ : शिक्षण प्रसारक मंडळीच्या नू. म. वि. मुलींच्या प्रशालेत विज्ञान दिन साजरा करण्यात आला. सर सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका संगीता कांबळे, उपमुख्याध्यापिका उल्का पाटणे व पर्यवेक्षिका वर्षा गुमास्ते यांच्या हस्ते करण्यात आले. आठवीच्या वर्गातील वेदिका काळे व भावना बोरा या विद्यार्थिनींनी विज्ञान दिन व सर सी. व्ही. रामन यांच्याविषयी माहिती सांगितली. प्रशालेतील विज्ञानविषयक विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थिनी सिद्धी गायकवाड व त्रिवेणी जगताप यांनी दिली. या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थिनींनी बनविलेल्या विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन भरविण्यात आले. यासाठी विज्ञान शिक्षिका मीनाक्षी शिंगाडे, अबोली घोगले, मोनिका वालिया यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व अहवालवाचन नीता रायरीकर यांनी केले. अंजली जोशी यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.