पुणे

दोन कोटींच्या खंडणीसाठी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण

CD

पुणे, ता. ४ : पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरातील एका हिरे व्यापाऱ्याचे दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मंगळवारी (ता. ४) दहा ते बारा संशयितांची चौकशी करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत व्यापाऱ्याचा ठावठिकाणा लागलेला नव्हता.

याबाबत हिरे व्यापाऱ्याच्या पत्नीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी व्यापाऱ्याने पत्नीला काही कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगितले. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने व्यापाऱ्याच्या मोबाईलवरूनच पत्नीच्या मोबाईलवर संपर्क साधला. ‘मी तुमच्या पतीचे अपहरण केले आहे, दोन कोटी रुपये तयार ठेवा,’ असे सांगून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पत्नीने पोलिस नियंत्रण कक्षात माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

दुचाकी आढळली, मोबाईल बंद
तपासादरम्यान, व्यापारी सोमवारी (ता. ३) सायंकाळी नवले पूल परिसरात असल्याचे समोर आले आहे. या भागात व्यापाऱ्याची दुचाकी आढळून आली असून, मोबाईल बंद आहे. या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येत आहेत. या व्यापाऱ्याने काही जणांकडून पैसे घेतले आहेत. मागील वर्षभरात व्यापारी कामानिमित्त तीन वेळा दुबईला जाऊन आला आहे. या प्रकरणात सर्व शक्यता तपासण्यात येत असल्याचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT