पुणे

पोलिसांशी हुज्जत घालत मेट्रो स्थानकात आंदोलन

CD

पुणे, ता. ९ ः स्त्रियांवरील अत्याचाराच्या विरोधात तसेच मेट्रोमध्ये तरुणांना रोजगार मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुणे महापालिका कार्यालयासमोरील मेट्रो स्थानकावर तासभर आंदोलन केले. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. आंदोलकांनी पोलिसांना धक्काबुक्कीही केल्याचा प्रकार घडला.
आंदोलक गुपचूप मेट्रो स्थानकात पोहोचले. यानंतर ते थेट मेट्रो रुळांवर उतरले. पक्षाचे नेते नरेंद्र पावटेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. आंदोलक मेट्रो रुळावर उतरताच पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला.
एक तास उलटूनही आंदोलक ऐकून नसल्याने पोलिस मेट्रो रुळावर उतरले, मात्र आंदोलकांनी पोलिसांशी बाचाबाची केली. या वेळी धक्काबुक्कीही झाली. आंदोलकांनी महिला पोलिस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप झाला. त्यामुळे पोलिसांचा संयम सुटला. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करण्यास सुरुवात केली.
आंदोलकांनी परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनाही धक्काबुक्की केल्याने प्रकरण जास्त चिघळले. पोलिसांनी आंदोलकांना चोप देत पोलिस व्हॅनमध्ये बसविले. त्यानंतर आंदोलकांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते.
---
खाली उड्या मारण्याचा इशारा
पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यातच रुळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तर खाली उड्या मारण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. त्यामुळे आंदोलकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी मेट्रो रुळाच्या खाली संरक्षक जाळ्या धरून पोलिस जवानांना उभे केले होते.
-----
पावटेकर यांची हकालपट्टी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले की, ‘या घटनेनंतर नरेंद्र पावटेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांचे आजचे आंदोलन वैयक्तिक आहे. त्याचा पक्षाशी काही संबंध नाही. पुणेकरांची अडवणूक करणे आणि पोलिस अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत घालणे या सर्व प्रकारांशी पक्षाचा काहीही संबंध नाही. त्यांनी केलेला प्रकार निषेधार्थ आहे.’
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT