पुणे, ता. ९ : शहरात दोन दिवसांपासून कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली होती. मात्र रविवारी कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसने घट झाली. पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान सलग तिसऱ्यादिवशी कोरेगाव पार्क परिसरात पारा चाळिशीपर्यंत पोचला तर तळेगाव ढमढेरे आणि राजगुरुनगर परिसरात ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
शहरासह जिल्ह्यात आठ दिवसांपासून कमाल तापमान वाढल्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. दुसरीकडे रात्री हवेत गारवा असल्यामुळे पहाटे किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. परिणामी १६ ते १७ अंश सेल्सिअसवर असलेले किमान तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. गेल्या २४ तासांत किमान तापमानात घट झाल्यामुळे रविवारी किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. त्यामुळे पहाटे गारवा आणि दिवसभर उन्हाच्या चटक्याने अंगाची लाहीलाही होत होती.
जिल्ह्यातील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
- कोरेगाव पार्क- ३९.६
- तळेगाव ढमढेरे- ३९.३
- राजगुरुनगर- ३९
- चिंचवड- ३८.६
- पुरंदर- ३८.४
- तळेगाव- ३८.३
- वडगावशेरी- ३८.२
- मगरपट्टा- ३७.६
- शिवाजीनगर व लवळे- ३७.५
- पाषाण- ३७.२
- एनडीए- ३६.९
- इंदापूर- ३६.६
- हवेली व बारामती- ३६.४
- दौंड- ३५.५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.