पुणे

कोंढव्यातील शाळांत नववी-दहावीचे वर्गच नाहीत

CD

पुणे, ता. १० ः कोंढव्यातील महापालिकेच्या तीन शाळा आठवीपर्यंतच आहेत. नववी-दहावीचे वर्ग नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी परवड होत आहे. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्षच करीत आहे. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेणे अशक्य होत आहे. त्यामुळे त्यांची गळती होते.
संत गाडगे महाराज शाळा (११२ ब), अब्दुल कलाम आझाद शाळा (२०९ ब) व बापूसाहेब दरेकर शाळा (१७५ ब) अशा तीन शाळा आहेत. गाडगे महाराज शाळेत ४०, आझाद शाळेत १२० तर दरेकर शाळेत ४० असे एकूण २०० विद्यार्थी शिक्षण घेतात. कोंढवा, पिसोळी, टिळेकरनगर, उंड्री येथील गरीब कुटुंबे आणि वस्त्यांमधील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. या शाळांत आठवी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी भवानी पेठेतील महापालिकेच्या शाळेत जावे लागते.
या शाळा सुरू झाल्यापासून अनेकदा नववी-दहावीपर्यंतचे वर्ग वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. आम आदमी पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष एम. अली सय्यद यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे यासाठी पाठपुरावा केला आहे. ते म्हणाले, ‘‘गेल्या एका वर्षापासून मी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. यानंतरही महापालिकेकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.’’
---------
विद्यार्थी-पालकांची परवड
- गरीब व कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यात अडचणी
- विद्यार्थिनींना पुढील शिक्षणासाठी पाठविण्यात पालकांमध्ये उदासीनता
- हलाखीच्या परिस्थितीमुळे प्रवासखर्च परवडत नसल्याने विद्यार्थी मागे पडतात
- परवडत नसूनही जादा शुल्क भरून मुलांना खासगी शाळेत टाकणे पालकांना भाग
- दहावीपर्यंत शिक्षण नसल्याने विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांची संधी हुकणे
------------------
कोंढव्यातील शाळांमध्ये नववी-दहावीचे वर्ग सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. मान्यता मिळाल्यानंतर हे वर्ग सुरु करू. मान्यतेस एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. जून महिन्यापासून हे वर्ग सुरू होण्याची शक्‍यता आहे.
- आशा उबाळे, शिक्षणाधिकारी, महापालिका
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: यवतमाळमध्ये कडक उन्हामुळे शेतातील डिस्ट्रिब्युशन बॉक्सने घेतला पेट

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT