पुणे

स्वारगेटचा वीजपुरवठा सुरळीतच ः महावितरण

CD

पुणे, ता. १२ : स्वारगेट येथील एसटी बस स्थानकाचा वीजपुरवठा मंगळवारी (ता. ११) रात्रभर सुरळीत सुरू होता. स्वतंत्र वीजजोडणी असलेल्या आगारात तांत्रिक बिघाडामुळे दोन फेज सुरू असले तरी हायमास्ट आणि कार्यालयांचा वीजपुरवठा सुरू होता, असा दावा ‘महावितरण’ने केला.
बस स्थानकात मंगळवारी रात्रभर वीज खंडित होती, अशा तक्रारी आल्या होत्या. त्यावर हे स्पष्टीकरण देण्यात आले. बस स्थानक व आगारासाठी स्वतंत्र उच्चदाबाची वीजजोडणी आहे. यातील बस स्थानकाचा वीजपुरवठा अखंडित व सुरळीत आहे. आगाराच्या जोडणीला वीजपुरवठा करणाऱ्या भूमिगत वीजवाहिनीत काल सायंकाळी बिघाड झाला. मात्र दोन फेजद्वारे आगारात कार्यालयीन व हायमास्ट दिव्यांचा वीजपुरवठा सुरू ठेवण्यात आला. बिघाड झालेली वीजवाहिनी उड्डाणपुलाखालील काँक्रीट रस्त्याखाली आहे. त्यामुळे आगाराला पर्यायी व्यवस्थेतून तीन फेज वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या 40 व्या वर्षी निधन; कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

America-Israel War: आता लास्ट.. बुधवारपर्यंत ऐकलं नाही तर...; ट्रम्प यांचा इराणला आणखी एक अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: अमरावतीत न्यायालयासमोर वकिलाला महिलांकडून मारहाण

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

Sangli Politics : सांगली महापालिकेत भाजप-काँग्रेसचं धक्कातंत्र! पराभूत उमेदवारांना दिली संधी, निष्ठावंतांचा पत्ता केला कट, यादीत अनेक अनपेक्षित नावे

SCROLL FOR NEXT