पुणे

महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्याची गरज : सुप्रिया बडवे

CD

पुणे, ता. १७ ः ‘‘अथक परिश्रम, चिकाटी आणि वेगवेगळ्या आघाड्यांवर एकाचवेळी काम करण्याची कसब, असे उद्योजक होण्यासाठी आवश्यक असणारे गुण महिलांमध्ये उपजतच असतात; परंतु महिलांना योग्यवेळी संधी न मिळाल्यामुळे त्या उद्योग क्षेत्रात मागे राहतात. उद्योग क्षेत्रातील प्रमाण वाढण्यासाठी महिलांना योग्यवेळी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे,’’ असे मत उद्योजिका सुप्रिया बडवे यांनी व्यक्त केले.

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियानतर्फे (युवा) उद्योग क्षेत्रातील महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा कार्यक्रम टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात पार पडला. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष-विश्राम कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत जोशी, हर्षल लेले, प्रतिभा संगमनेरकर, स्वाती कुलकर्णी, कार्तिकी जोशी, मंजूषा वैद्य, अंजली दारव्हेकर, उपेंद्र केळकर, आशिष कुलकर्णी, सचिन पंडित, प्रशांत देशपांडे, अजय कुलकर्णी, मंदार महाजन आदी उपस्थित होते.
‘स्वयंसिद्धा पुरस्कार’ पुण्यातील गजानन एंटरप्राइजेसच्या संचालिका वैशाली धर्माधिकारी, ‘युवा उद्योजिका पुरस्कार’ आर्टिसन प्रिंट ॲण्ड पॅकच्या संचालिका सानिया वाळिंबे यांना प्रदान करण्यात आला. ‘युवा गौरव पुरस्कार’ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोगळेकर यांना प्रदान करण्यात आला. युवा उपक्रमांतर्गत सावित्रीबाई नारायण जोशी स्मरणार्थ ‘स्वयंसिद्धा पुरस्कार’ आणि मनोरमा श्यामराव कुंभोजकर स्मरणार्थ ‘युवा उद्योजिका पुरस्कार’ दिला जातो; तर ‘युवा गौरव पुरस्कार’ हा युवा कार्यकारिणी पुरस्कृत आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

RTE Admission Issue : वसईत आरटीई प्रवेशावरून गोंधळ; टोकन न मिळाल्याने पालकांमध्ये संताप, भर उन्हात पालकांच्या लांबचलांब रांगा

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT