पुणे, ता. १६ ः ‘‘प्रेम, आपुलकी आणि उत्कटता या गोष्टी माणसाला कल्पनाशील आणि सृजनशील बनवतात. खरे प्रेम हे काळाच्या कसोटीवर नेहमीच टिकून राहिले आहे. त्याचेच प्रतिबिंब साहित्यात उमटलेले दिसून येते,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केले.
अमोल सोंडकर यांच्या ‘फुलपाखरू ः रंग काळजाशी भिडलेला’ या कादंबरीचे प्रकाशनसमारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, ‘सकाळ’चे उपसंपादक व विनोदी साहित्यकार सु. ल. खुटवड, कात्रज दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये, प्रा. कुंडलिक कदम, तांभाडच्या माजी सरपंच प्रभावती सोंडकर, रामदास सोंडकर आदी उपस्थित होते.
जोशी म्हणाले, ‘‘बदलत्या काळाबरोबर प्रेम व्यक्त करण्याचे स्वरूपही बदलत चालले आहे. ‘फुलपाखरू...’ या कादंबरीत पौगंडावस्थेतील प्रेमाचे चित्रण संयमशीलतेने रेखाटलेले आहे. यातील भाषा ही ग्रामीण भागातील प्रतिनिधित्व करते. त्यातूनच ग्रामीण भागाचा पट डोळ्यांसमोर उभा राहतो.’’
शिळीमकर म्हणाले, ‘‘सोशल मिडियामुळे वाचनसंस्कृती लोप पावत चालल्याचे दिसून येते. मात्र, हे चित्र बदलण्यासाठी वाचकांनीच पुढाकार घ्यायला हवा तरच पुस्तकांना आणि लेखकांना वैभवाचे दिवस येतील.’’
खुटवड यांनी पूर्वीच्या काळातील आणि सध्याच्या काळातील प्रेम यातील फरक उदाहरणांसह स्पष्ट करून हशा आणि टाळ्या मिळवल्या.
यावेळी कुंडलिक कदम, मनोज लिमये यांचीही भाषणे झाली. सचिन सोंडकर, अमृता सोंडकर यांनी स्वागत केले. सानवी जोगदेव, संजना पवार यांनी सूत्रसंचालन केले. अभिषेक सोंडकर यांनी आभार मानले.
फोटोः
----------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.