पुणे

मुले म्हणजे ईश्वराच्या बागेतील फुले : हजरत पैगंबर

CD

- डॉ. एस. एन. पठाण
हजरत पैगंबरांना लहान मुलांचा फार लळा लागला होता. ते रस्त्यावरून जाऊ लागले असता मुलांचा घोळका त्यांच्याभोवती जमे. पैगंबर प्रत्येक लहान मुलाला उचलून घेऊन प्रेमाने चुंबन घेत. आपल्याजवळ असलेली मिठाई किंवा खजूर सर्वांना वाटून देत.
लहान मुलांना धाकात किंवा कडक शिस्तीत ठेवले तरच मुले पुढे चांगले नागरिक होतात हा काही लोकांचा सिद्धांत हजरत पैगंबरांना मान्य नव्हता. अशा रीतीने लहान मुलांना वागविले तर त्यांची सर्व दृष्टीने होणारी वाढ खुंटेल, असे त्यांना वाटे. लहान मुलांना पौष्टिक अन्नाची जितकी गरज आहे तितकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त त्यांना ममतेने वागविण्याची आहे. कोवळ्या तरूंना जशी सूर्यप्रकाशाची तशी लहान मुलांना ममतेची अत्यंत आवश्यकता आहे, असे हजरत पैगंबर म्हणत. "जो लहान मुलावर प्रेम करीत नाही, त्यांना मायेने जवळ घेत नाही किंवा दयाळूपणाने वागवीत नाही, तो सच्चा मुसलमान नव्हे" असे हजरत पैगंबरांनी अगदी यथार्थ उद्गार काढले आहेत.
एकदा एक चुकलेले लहान मूल रस्त्यावर रडत उभे होते. हजरत पैगंबरांनी त्याला प्रेमाने कडेवर घेतले व मोहल्ल्या मोहल्ल्यामध्ये जाऊन त्याच्या आई-वडिलांची चौकशी केली. पण, दुर्दैवाने त्यांचा पता लागला नाही. शेवटी त्या मुलाला हजरत पैगंबरांनी आपल्या घरी नेले व त्याला न्हावू-खाऊ घातले. कित्येक दिवस ते मूल त्यांच्या घरीच होते. शेवटी त्या मुलाचे आई-वडील आल्यानंतर त्या मुलाला त्यांच्याकडे सुपूर्द केले.
लहान मुले मग ती कोणत्याही धर्माची असोत, हजरत पैगंबरांना ती सारखीच प्रिय असत. त्यांच्याजवळ ही मुस्लिम मुले व इतर परधर्मीयांची मुले असा मुळीच भेदभाव नव्हता. लहान मुले म्हणजे परमेश्वराच्या बागेतील फुले आहेत, अशी हजरत पैगंबरांची भावना होती. लढाईच्या वेळी मुले, स्त्रिया व ज्येष्ठांना काडीमात्र दुखापत करू नये, असे खास फर्मान हजरत पैगंबरांनी काढले होते. "लहान बालकांवर प्रेम करणाऱ्यास स्वर्गाचे द्वार खुले असते" असे उद्गार हजरत पैगंबरांनी काढले आहेत.

(लेखक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)

इफ्तार वेळ : ६.४७ (मंगळवारी सायंकाळी)
सहेरी वेळ : ५.२२ (बुधवारी सकाळी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT