पुणे, ता. १८ : गुलियन बॅरी सिंड्रोमची (जीबीएस) रुग्णसंख्या कमी झाली आहे. तसेच सिंहगड रस्त्यावर जेथे या आजाराचे रुग्ण आढळले होते त्या परिसरातून (क्लस्टर) शेवटचा रुग्ण १८ फेब्रुवारीला आढळला होता. तेथून नवीन रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे ही साथ आटोक्यात आली असून लवकरच याचे सर्वेक्षण बंद करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली.
याबाबतचे पत्र आरोग्य उपसंचालक व साथरोग विभागाला देण्यात येणार असल्याचेही डॉ. बोराडे यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, दूषित पाण्यामुळे व त्यामध्ये सापडलेल्या कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी व नोरोव्हायरसमुळे ‘जीबीएस’ आढळून आल्याचे सद्यःस्थितीत दिसून येत आहे. त्यामुळे त्याबाबत पाणीपुरवठा शुद्धीकरण करून हा प्रश्न आटोक्यात आला आहे. तसेच सध्या जी रुग्णसंख्या आढळून येत आहे ती नियमितपणे आढळून येणारी आहे. त्यामध्ये सिंहगड रस्त्यावरील साथीचा संबंध नाही. तसेच कोणत्याही आजाराचे सर्वेक्षण थांबविताना त्या आजाराचा अधिशयन काळ (विषाणूची, जीवाणूची लागण झाल्यापासून लक्षणे दिसण्यापर्यंतचा काळ) पूर्ण झाला तरी रुग्ण न आढळल्यास त्या आजाराची साथ नियंत्रणात आल्याचे समजले जाते. त्यानुसार फेब्रुवारीच्या १८ तारखेला शेवटचा रुग्ण आढळल्याने त्याला महिना होत आहे.
सध्या रोज घरोघर संशयित रुग्णांची तपासणी व सर्वेक्षण सुरू आहे. ते थांबविण्यात येईल. महापालिकेच्या बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या डायरियाच्या रुग्णांची नोंद ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल व उपचार केले जातील. पाण्याची सातत्याने तपासणी करण्याबाबत पाणीपुरवठा विभागालाही पत्र दिले आहे.
- डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका
पाण्याच्या नमुन्यांची तपासणी
- पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून पाठवलेले नमुने - ३७३५
- पाणी पिण्यास अयोग्य असलेले टँकरचे नमुने -१५
- दूषित पाणीपुरवठा करणारे आरओ प्लांट - ३९
- एनआयव्हीला पाठवलेले पाणी नमुने - २१४
- दूषित नमुने - ६
- राज्य प्रयोगशाळेकडे पाठवलेले नमुने - ८०
- दूषित आढळलेले नमुने - २४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.