पुणे

सरकार समाजाचेच प्रतिबिंब ः शेफाली वैद्य

CD

पुणे, ता. १८ : ‘‘सरकार हे समाजाचेच प्रतिबिंब असते. ज्या पद्धतीचा समाज असतो त्याच पद्धतीचे सरकार अस्तित्वात येते. त्यामुळे सरकारकडून बदलांच्या अपेक्षा करताना समाजालाही स्वतःमध्ये बदल घडावे लागतीत’’, असे मत लेखिका शेफाली वैद्य यांनी व्यक्त केले.
पुणे मराठी ग्रंथालयातर्फे रामभाऊ म्हाळगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘लोकप्रतिनिधी - आदर्श, अपेक्षा आणि वास्तव’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी पुणे मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष धनंजय बर्वे, कार्याध्यक्ष श्रीकांत देव, विद्युत पावगी, मेधा रानडे आदी उपस्थित होते. वैद्य म्हणाल्या, ‘‘आपल्याकडे त्रिस्तरीय राज्यपद्धती आहे. मात्र कोणत्या स्तरावरील नेत्याने कोणती कामे करावीत, या संदर्भात कोणतीही नियमावली नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोणाला देणगी देणे, शिफारसपत्र देणे, शाळेमध्ये प्रवेश मिळवून देणे, बदली थांबविणे यांसारखी कामे लोकप्रतिनिधींची नाहीत. मात्र ही कामे केली नाहीत तर हा लोकप्रतिनिधी आपली कामे करत नाही, असा नागरिकांचा समज होतो. त्यामुळे नागरिकांनी कोणत्या लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा कराव्यात, यासंदर्भात जागरूक निर्माण होणे आवश्यक आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT