पुणे

भारती पवार अनंतात विलीन

CD

पुणे, ता. १८ : भारती प्रतापराव पवार मंगळवारी दुपारी अनंतात विलीन झाल्या. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पवार कुटुंबीयांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पत्नी आणि ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या मातुःश्री भारती पवार यांचे सोमवारी (ता. १७) सायंकाळी पुण्यात निधन झाले. मंगळवारी (ता. १८) सकाळी ९​ ते ११ या वेळेत बाणेर येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. राजकीय, सामाजिक, उद्योग यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी येथे दर्शन घेतले. त्यानंतर दुपारी १२ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रतापराव पवार, पुत्र अभिजित पवार, कन्या अश्विनी, सून मृणाल पवार आणि कुटुंबीयांचे समाजातील विविध स्तरांतील लोकांनी सांत्वन केले.
याप्रसंगी पवार कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, आशा पवार, प्रतिभा पवार, सरोज पाटील, मीनल सासणे, डॉ. मनोहर सासणे, खासदार सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, रणजित पवार, जयंत पवार, विजया पाटील, डॉ. रजनी इंदुलकर, शर्मिला पवार, सुनंदा पवार, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार, जय पवार, जान्हवी पवार, राहुल पवार, रेवती सुळे, शुभांगी पवार, निकोलस पवार, जोनस पवार, दिलीप माने, जयश्री माने, जयदीप माने, अभय माने, संजीव पाटील, यश पाटील, हेमा मेहता, सुमीरन मेहता, ओजस मेहता, विक्रांत व गुंजन इंदुलकर, सुभाष इंदुलकर, विभा बोके, निमा माने, अभिषेक बोके, अभिजित जगधने, अभिजित जगताप, प्रफुल भोसले, डॉ. अनिल भोसले, नीता पाटील, डॉ. मोहन पाटील, किशोर पाटील आदींनी साश्रुनयनांनी भारती पवार यांना अखेरचा निरोप दिला.
या वेळी समाजाच्या विविध स्तरांतील मान्यवर, नागरिक उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया, सुमन किर्लोस्कर, सतीश मगर, विठ्ठल मणियार, सुनील व मालविका तांबे, हर्षवर्धन पाटील, डॉ. विश्वजित कदम, अशोक मोहोळ, उल्हास पवार, देविदास भन्साळी, मदन बाफना, विलास लांडे, अशोक पवार, मोहन जोशी, कमल ढोले पाटील, वालचंद संचेती, पोपटलाल ओस्तवाल, ॲड. एस. के. जैन, जगदीश कदम, प्रसन्न फिरोदिया, डॉ. राजेंद्र भोसले, प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी, दिलीप बंड, पोपटराव पवार, गजेंद्र पवार, हनुमंतराव गायकवाड, अमर मांजरेकर, अंकुश काकडे, कमल व्यवहारे, राजलक्ष्मी भोसले, एस. के. कुलकर्णी, अमित परांजपे, भरत अहुजा, भालचंद्र बिराजदार, रवी नातू, अलका नातू, जयदीप बेदी, नितीन देसाई, सुरेश पिंगळे, शीला पद्मनाभन, शिल्पा पद्मनाभन, मिलन दर्डा, विजय बाविस्कर, पराग करंदीकर, श्रीधर लोणी, संजय आवटे, विजय पारगे, प्रशांत गिरबने, मिलिंद कांबळे, मुक्ता दाभोळकर, श्रीमंत कोकाटे, राकेश शर्मा आदी उपस्थित होते.
डॉ. पराग काळकर, डॉ. आर. एम. चिटणीस, डॉ. सतीश देसार्इ, प्रशांत वाघमारे, अमित लुंकड, श्यामकांत कोतकर, अभिजित जगताप, रवी जैन, भूषण गोखले, तेजराज पाटील, अभय छाजेड, जालिंदर कामठे, संभाजी कुंजीर, सुनील चांदेरे, आबा बागूल, अविनाश साळवे, अतुल शितोळे, गोपाळ तिवारी, बाळासाहेब बोडके, उज्ज्वल केसकर, नीलेश निकम, महेश वाबळे, सनी निम्हण, बाबूराव चांदेरे, रवींद्र माळवदकर, अजय खेडेकर, लक्ष्मीकांत खाबीया, प्रदीप देशमुख, सचिन तावरे, सतीश मोहोळ, सुहास दगडे, ॲड. प्रताप परदेशी, ॲड. शिवराज जहागीरदार-कदम, नितीन पवार, मिलिंद देशमुख, श्रीपाल ललवाणी, सुषमा देशपांडे, सुनील महाजन, बाबा पाटील, समीर हंपी, प्रवीण बर्वे, शैलेश काळे, अरुण खोरे, रमेश डोईफोडे, अभय कुलकर्णी, अमित टेकाळे, अमित राठोड यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग, कला, क्रीडा, साहित्य, व्यापार आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही भारती पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT