पुणे, ता. १८ : शहरात सिमेंट मिक्सर आणि अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू झाला. या घटना लोहगाव आणि फुरसुंगी परिसरात घडल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार स्वप्नील प्रकाश साळवे (वय २२, रा. भालकुंड, जि. परभणी) सोमवारी सकाळी लोहगावमधील डी. वाय. पाटील महाविद्यालय रस्त्याने निघाला होता. त्यावेळी भरधाव सिमेंट मिक्सर वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यात स्वप्नील गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत माधव धोडिंबा साळवे (वय ५३, रा. डोंगरे वस्ती, निघोज, चाकण) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सिमेंट मिक्सरचालक वेंकट गुरप्पा पवार (वय ४५, रा. निरगुडी रस्ता, लोहगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे करीत आहेत.
अन्य एका अपघातात दुचाकीस्वार सूरज शरद धायडे (वय २३, रा. पॉवर हाऊस, फुरसुंगी फाटा, हडपसर) याचा मृत्यू झाला. सूरज रविवारी रात्री अकराच्या सुमारास घरी निघाला होता. त्या वेळी भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना फुरसुंगी परिसरात पॉवर हाऊससमोर घडली. या प्रकरणी आकाश शरद धायडे (वय १९) याने फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तेहसीन बेग करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.